Posts

Showing posts from July, 2025

Robin sharma's "The Mastery manual"

Robin sharma's  "The Mastery manual" What a fantastic guaiding book.  Instead of saying just completed reading.. I would like to say completed 1st revison. and many more will come.  This single book is coch for leading not just professionaly but personally.  He covered everything what required to become a true leader, thirsty businessmen, the philosopher and a complete happy satisfied human being...  Finally I would like to say reading is not just hobby make this habit.. becoz only your habits stand you differently in crowd.  My 4 P's are Plan, Practice, Play and be patience..  Eighther you will win or learn... Thank you  Jayant jagtap #growth #mindset #leadership #learn.

कनेक्शन

                  Connections  आज एक नवीन नंबर वरून फोन आला, नमस्कार करून त्यांनी नाव सांगितले (नाव इथे सांगत नाही)  सांगलीवरून बोलतोय. माझ्या लेख त्यांना फिरत फिरत व्हॉट्सॲप वर मिळाले आणि त्यांनी आवर्जून वाचले आहेत आणि ते सांगितले. मी आभार मानले. मग त्यांनी सांगितले त्यांचा गोल्ड टेस्टिंगचा बिझनेस आहे आणि ते आमच्या कंपनीचे ग्राहक आहेत. सध्या ते भागलपूर बिहार मध्ये त्यांचा व्यवसाय करतात.  टेस्टिंग साठी ते आमची मशीन वापरतात. त्या मशीन संदर्भात त्यांना मदत हवी आहे. माझे लेख आणि विचार वाचून त्यांना मी 100% टक्के मदत करेन अशी त्यांना खात्री आहे असे ते बोलले. मीही त्यांना आश्वस्त केले की आमचे ग्राहक म्हणून मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार यात शंका नाही. सोबत तुम्ही आमचे गाववाले आणि सोन्याच्या बिझनेस मधे आपला मराठी माणूस जम बसवतोय तर नक्कीच योग्य आणि प्रामाणिकपणे संपूर्ण सहकार्य राहील.  पहिलं तर आजकाल insta च्या जगात फक्त इंस्टाग्राम स्टार लक्षात राहतात तिथे आपले लेख वाचून आपल्याला नावा सहित लक्षात ठेवले हे ऐकून छान वाटले. आपले ल...

व्यावसायिक जीवनाची 18 वर्ष

        *व्यावसायिक जीवनाची 18 वर्ष* या जून मध्ये माझ्या व्यावसायिक जीवनाची 18 वर्ष पूर्ण झाली. 18 वर्षात मूल परिपक्व होतात तसेच आपण ही व्यावसायिक जीवनात परिपक्व झालो का याचा हा आढावा.  2007 ते 2025 या कालावधीत अनेक अनुभव नवीन गोष्टी, असंख्य व्यक्ती आणि वल्ली भेटले. खूप शिकलो, घडलो, स्वतःचे गुण विकसित केले. Weighing इंडस्ट्री मध्ये एक्स्पर्ट म्हणून नाव कमावले. 2023 मध्ये कॅम्प ऑल इंडिया "सर्विस चॅम्पियन ऑफ the year"  हा अवॉर्ड मिळवलां आणि टीम लीडर म्हणून मॅनेजमेंट मधे काम करू लागलो. इथे ही नवीन नवीन सकारात्मक बदल घडवत busines मधे  नावीन्य आणत आहे.    व्यावसायिक जीवनाच्या करियर मध्ये गेली 18 वर्षे अनेक देश फिरलो, भारतात तर सर्व राज्य पालथी घातली, छोटी छोटी खेडी, शहरे, जंगलातील सिमेंट प्लांट, स्टील, पॉवर प्लांट, समुद्र किनारी असलेली पोर्ट, अगदी गुजरात चे प्रसिद्ध mundra पोर्ट ते ओडिशा मधील धामरा पोर्ट ते दक्षिणेतील कृष्णा पटनम पोर्ट.  कोणते राज्य बाकी राहिले नाही. पुर्वेकडील राज्य शिल्लक होती तीदेखील गेल्या 2 वर्षात नवीन प्रॉडक्ट लाइन हॅण्...

भूल चूक माफ

                       *भूल चूक माफ*  विमानातील प्रवास म्हणजे माझे लिखाण करायचे सर्वोत्तम ठिकाण. एक चहा किंवा कॉफी घ्यायची आणि मग ज्या वेगाने विमान उडत असते त्या वेगाने माझे डोके लेख लिहायला धावत असते.  राजकुमार रावचा आताच 2 महिन्यापूर्वी आलेला सिनेमा *भूल चूक माफ* पहिला.अतिशय सध्या गोष्टीतून दिलेल्या खूप मोठा संदेश. मला समजलेलं संदेश खालील प्रमाणे. 1. कोणाला आपल्या शब्दांनी आपल्या कृतीने दुखावू नका 2. सत्कर्म करत राहा, दान धर्म करत रहा.  3. भ्रष्टाचार करून, लाच देऊन कोणाचे दुसऱ्याचे नशिबाचे हुसकावून घेऊ नका.  4. आणि कर्म करत रहा.. फळाची अपेक्षा ठेवू नका.  नाहीतर तुमचेच आयुष्य पुढे सरकणार नाही.  वाराणसी शहरात घडणारी ही गोष्ट. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम, मुलाचे घरचे लग्नाला तयार पण मुलीच्या वडीलांना मुलगा सरकारी नोकरीवाला हवा असतो. त्यात मुलाला पळून जाऊनही लग्न करायचे नसते.   मग यासाठी काय करायचे तयार तर सेटिंग लाऊन पैसे भरून, लाच देऊन सरकारी खात्यात नोकरी लावली जाते. Joining letter येते ...

only change is permenant

        *Only change is permenent*        *फक्त बदल हा कायमस्वरूपी असतो* स्थलांतर हा मानवाचा स्थायी स्वभाव आहे.- डॉक्टर APJ कलाम.  माणूस ओळखला जातो त्याच्या कर्तृत्व वरून.  पुरातन काळापासून अनेक माणसं विविध प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात कामानिमित्त, काही आवड म्हणून, काही लढाया जिंकून नवीन प्रदेश पादाक्रांत करून, काही या युद्धना घाबरून, आपला जीव वाचवून, अनेक जण आपल्या कामगिरीच्या जोरावर बक्षीस म्हणून मिळणाऱ्या जहागिरीचा भाग म्हणून असे अनेकविविध कारणांनी एक शहरातून- खेड्यातून दुसऱ्या खेड्यात शहरात,  एक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात,  एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होतं असतात आणि आताच्या काळात तर देशांतर्गत स्थलांतर साधारण झाली आहेत. तिकडे जातात तिकडे स्थिरावतात. तिथलेच जीवनमानाचा भाग होईन जातात,  जिकडे जातात तिकडे गुण्यागोविंदाने राहतात, त्या गावात, खेड्यात, शहरात, आधी राहणारे पण कुठून तरी आलेले असतात. मग यात जो कर्तृत्वाने, सामाजिक कार्याने, समाजासाठी काही तरी तळमळ असलेले, आपल्या कलागुणांनी तेथील व्यवस्था बदलतात, नवीन...

कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा

        *कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा*..  आमच्या गावाकडे पूर्वी अनेक लाकडी आडाची घर असायची. त्या घरात वाटीवर जो माळा असायचा तो लाकडी फळ्यांचा असायचा. 5 फुटांचा 1 खण, प्रत्येक खनावर एक लाकडी खांब, खांब खालून सडू नये म्हणून त्याखाली 1sq फुटाचा चौकोनी दगड आणि त्यावर 6 फूट उंच खांब. मग त्यावर आडवे खांब. त्यांची लांबी साधारण 10फूट असायची.  त्या आडव्या खांबावर व्यवस्थित फळ्या ठोकून माळा तयार व्हायचा. त्या आडव्या खांबावर सुविचार लिहलेले असायचे. असच 14 खनाचं लांबच्या लांब अस माझ्या मावशीचे घर आहे त्यावर त्यातील खांबावर लिहिलेले सुविचार लहानपणी आम्ही अनेकदा वाचायचो आणि पाठ करायचो. त्यातील अनेक सुविचारपैकी लक्षात राहिलेला सुविचार म्हणजे, "कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा"..  आज आपण यातील दिलदार शत्रू याविषयावर बोलणार आहे.  आजकाल जी युद्ध चालू आहेत रशिया-युक्रेन, इस्रायल - हमास किंवा इराण, आणि गेली 75 वर्ष सुरू असलेलं भारत - पाकिस्तान. अशाच लढाया देशांतर्गत, राजकारणात, समाजकारणात, धर्मधर्मात सुरू असतात.  यात सहसा दोन प्रकारचे शत्रू असतात, एक ज्य...

रस्त्यावर संघर्ष टाळणे

      संघर्ष टाळला की आनंद आणि समाधान भेटतो सध्या माझं, माझ्या वडिलांच (बापूंच) आणि माझ्या मुलाचं आराध्यचे संध्याकाळच एक छान रूटीन झालं आहे. रोज सायंकाळी 6 वाजता आम्ही घरातून बाहेर पडतो, एक गार्डन शोधतो तिथे जातो, आराध्यला खेळवतो. तो ऑटिस्टिक आहे त्यामुळे त्याचे मूड बदलत राहतात त्यानुसार आम्ही रोज वेगवेगळ्या रस्त्याने घरी येत असतो.  आज एक ते दीड तास घणसोली सेंट्रल पार्क मध्ये खेळवून, घणसोली ब्रीजच्या पुढे येऊन सेक्टर 4 मध्ये उजवीकडे वळलो 1 ते 4 च्या गार्डन रस्त्याने वॅगन r गाडीने  हळूहळू येत होतो. सध्या चाळीत गाड्या जास्त झालेत आणि पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दुपदरी रस्ते पार्किंग मुळे खूप छोटे झाले आहेत. समोरासमोर 2 गाड्या आल्या तर त्यांना पास होण्यासाठी देखील जागा राहत नाही.  अशाच छोट्या झालेल्या रस्त्यावरून हळूहळू सालदार दादा च्या जुन्या ऑफिस पाशी पोहचलो आणि समोरून right टर्न घेऊन एक टी परमिट ertiga गाडी वाला पुढे येत होता. मी त्याला लाईट दिली तरी देखील तसाच पुढे आला. गाडीत 4 ते 5 जण तरुण मुलं दिसत होती. मी त्याला विनंती केली परंतु त्याने ऐक...