रस्त्यावर संघर्ष टाळणे
संघर्ष टाळला की आनंद आणि समाधान भेटतो
सध्या माझं, माझ्या वडिलांच (बापूंच) आणि माझ्या मुलाचं आराध्यचे संध्याकाळच एक छान रूटीन झालं आहे. रोज सायंकाळी 6 वाजता आम्ही घरातून बाहेर पडतो, एक गार्डन शोधतो तिथे जातो, आराध्यला खेळवतो. तो ऑटिस्टिक आहे त्यामुळे त्याचे मूड बदलत राहतात त्यानुसार आम्ही रोज वेगवेगळ्या रस्त्याने घरी येत असतो. आज एक ते दीड तास घणसोली सेंट्रल पार्क मध्ये खेळवून, घणसोली ब्रीजच्या पुढे येऊन सेक्टर 4 मध्ये उजवीकडे वळलो 1 ते 4 च्या गार्डन रस्त्याने वॅगन r गाडीने हळूहळू येत होतो. सध्या चाळीत गाड्या जास्त झालेत आणि पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दुपदरी रस्ते पार्किंग मुळे खूप छोटे झाले आहेत. समोरासमोर 2 गाड्या आल्या तर त्यांना पास होण्यासाठी देखील जागा राहत नाही. अशाच छोट्या झालेल्या रस्त्यावरून हळूहळू सालदार दादा च्या जुन्या ऑफिस पाशी पोहचलो आणि समोरून right टर्न घेऊन एक टी परमिट ertiga गाडी वाला पुढे येत होता. मी त्याला लाईट दिली तरी देखील तसाच पुढे आला. गाडीत 4 ते 5 जण तरुण मुलं दिसत होती. मी त्याला विनंती केली परंतु त्याने ऐकले नाही. मलाच हाताने खुणवून मागे जाण्यास सांगत होते. मी खूप पुढे आलो होतो आणि ते वळणावर होते तरी देखील त्यांच्यातील हाम पणामुळे त्यांना मागे जायचे नव्हते. मी त्यांना बाहेर यायची विनंती केली परंतु ते आले नाहीत आणि आतूनच हाताच्या पंजाने मला मागे जायला खुणवत होते. माझे मागे बाईक वाले येत होते. बापूंना म्हटले आपण जाऊ मागे नको इथे वाद. मग हळू हळू आम्ही जवळ जवळ 10 मीटर गाडी मागे घेतली. आम्ही स्मितहास्य करत करत त्यांना जाऊ देत होतो परंतू जाता जाता आमच्याकडे बघत त्यातील मागील सीट वर बसलेला काचा बंद करून काहीतरी बोलत जात होता. हसत हसत बापूंना म्हटले हे चार जण होते म्हणून खूप शहाणे बनत आहेत काय. आपल्याला वाद नको म्हणून आपण मागे आलो आणि वरून हेच काहीतरी बडबड करत जात आहेत. जर पण ठरवले असते यांना इथेच अद्दल घडवली असती पण आपल्याला जमेल इतका संघर्ष टाळायचा असतो. कारण रस्त्यावर केलेला संघर्ष कधीच कोणाच्या फायद्याचा नसतो. बापू नी देखील मला सांगितले जमेल इतका नम्रपणा घेऊन पुढे जाणे यातच शहाणपण असते. कारण रस्त्यावर कोण कोणाचे नसतं.
आज हा संघर्ष टाळून मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान भेटले.
जयंत जगताप
5.6.2025
जय हरी विठ्ठल माऊली
Comments
Post a Comment