आबा आणि प्रीतीश वाढदिवस
*आबा आणि प्रीतीश वाढदिवस* मंडळ प्रगती करतात ती प्रामाणिक, एकनिष्ठ आणि स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे. टीमवर्क करणारे कार्यकर्ते, स्वतःला कोणत्याही पदाची, मानाची कसलीही लालसा नसणारे, फक्त आपले मंडळ कार्यरत राहिले पाहिजे, आपला गाव पुढे गेला पाहिजे या ध्यासाने कार्य करणारे कार्यकर्ते म्हणजे आबा आणि प्रीतीश. माझ्यासाठी एक सल्लागार आणि दुसरा माझा बॉडीगार्ड अशी भूमिका बजावणाऱ्या या श्री गणेश मित्रमंडळाच्या वाटचालीत सदैव मोलाची भूमिका बजवणाऱ्या आबा आणि प्रीतीश यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा