सूर्य उगवलाच नाही तर

        सूर्य उगवलाच नाही तर
 एक दिवशी संध्याकाळी आपला देवा मस्त पैकी फ्रेश होऊन कोकणात हॉटेल रूम मधे येतो. नेहमी प्रमाणे त्याचा दिवस रात्री सुरू होतो. जेवण वैगरे करून, बेडवर जाण्यापूर्वी आपला फेसवाश करून सोबत वॉटर proof I phone ला सुद्धा मस्त पैकी अंगोळ घालून घेतो. आणि बेडवर बसून स्पेशल रीळ शोधतो. ज्याप्रमाणे डिटेक्टीव ganGstar शोधतात त्याप्रमाणे कोणाला भेटणार नाही असे रीळ देवा शोधतो. नवीन नवीन कांड शोधतो आणि हौशी मंडळींना पाठवतो. मधेच आपले i phone चे special ईमोजी पाठवून ग्रुप वर हंगामा करतो. 10 12 ग्रुप वर धुडगूस घालून, जे गुपचूप मेसेज बघतात त्यांना चांगलेच शब्दांनी चोपून काढून मस्त पैकी रात्र घालवतो. आणि आता पहाटेची वाट बघतो. कारण आपला देवा पहाटे झोपतो. आणि 10 वाजता उठतो. 
पण आज काही पहाट व्हायचं चिन्ह दिसत नाही. घड्याळात 6 वाजले पण बाहेर काळाकुट्ट अंधार असतो. 
अगोदर तो खिडक्या पडदे उघडून बघतो पण काहीच दिसत नाही. त्याला शंका येते लक्ष्मण ने खडकीवर काळा पडदा तर नाही टाकला म्हणून काटीने ढकलून बघतो.. 
मग त्याला वाटते अमृता ने सूर्याचा मेकअप करून त्याला काळा रंग तर नाही ना दिला म्हणून तिला फोन करून विचारतो. तर ती त्याला वेड्यात काढते. कारण तिकडे तर सूर्य उगवलेला असतो. 
मग तो विचार करतो अरे आपण स्वतः देवा आहे डायरेक्ट सूर्याला फोन लावू मग डायरेक्ट कॉल करतो सूर्याला. 
सूर्यभाऊ कुठे राहिला मला दिसत का नाही. कुठे राहिलात तुम्ही आणि फक्त मला का दिसत नाहीत? या लवकर मला झोपायचे आहे. 
सूर्यभाऊ म्हणतात : अहो साहेब तुमचा लंगोटी मित्र सचिन ने जयंत ला निबंध लिहायला सांगितला की मी म्हणजे "सूर्य उगवला नाही तर". आणि त्या गोष्टीत हिरो म्हणून तुम्हाला घ्यायचे असे जयंत ने ठरवले. म्हणून गोष्ट खरी वाटावी म्हणून मी तुमच्यासाठी उगवलो नाही. 
हे ऐकून देवा एकदम खूष झाला आणि सूर्याला सुद्धा एक दोन रीळ पाठवून दिले. आणि लवकर यायची विनंती केली. 
मग सूर्य उगवला आणि देवा झोपायला गेला. 
तर बघा मित्रानो सूर्य उगवला नाही तर अस होऊ शकत. 

काल्पनिक गोष्ट
लेखक जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)