Posts

Showing posts from October, 2023

दसरा

     *महूचा दसरा* दसरा म्हणजे हिंदी मध्ये दश-हरा याच्या दोन कथा सांगितल्या जातात. पहिली म्हणजे या दिवशी रामाने रावणाला ठार केले आणि सीतेला मुक्त करून लंकेतून परत आणले आणि दुसरी म्हणजे याच दिवशी बारा वर्षे वनवास संपवूंन पांडवांनी आपल्या खऱ्या रुपात येत शमीच्या झाडावरून आपली शस्त्र बाहेर काढलीत आणि महाभारताच्या अंतिम पर्वास सुरवात केली.    जसा दिवाळी हा घरोघरी साजरा होणारा परंतू आपापला सण तसा दसरा हा सर्वांच्या सहकार्यातून एकत्रितरित्या साजरा होणारा सण.  महू गावात दसरा सण साजरा होतो तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने. घटस्थापनेला घट बसवले जातात आणि रोज 1 माळ चढवली जाते. अस 10 दिवस रोज संध्याकाळी आरती केली जाते. खरा जोरदार दसरा असतो तो दहाव्या दिवशी.  देवाची पालखी काढली जाते, ती स्वच्छ करून सजवली जाते, फुलांनी तिची आरास केली जाते. सोबत देवाची काठी म्हणजे लांब मोठा रंगीबेरंगी कापड बांधलेला कळक असतो. सोबत देवाची छत्री असते. ही सर्व तयारी झाली की दुपारी साडेतीन ला पालखीचे प्रस्थान होते ते बिरामनेवाडीच्या तामजाय देवीच्या मंदिरात. परंपरे नुसार भैरवनाथ तिच्या बहिणीला भे...

संघटन

                *संघटन/मंडळ* संघटन म्हणजे एका विचाराने एकत्र आलेला समहू. मग तो कसाही छोटा-मोठा कसाही असू शकतो. कोणतही संघटन तयार होत ते कोणत्या ना कोणत्या उद्देशासाठी. एकदा उद्धिष्ट ठरले की  ते रुजने, वाढणे, टिकणे, विस्तारने हे अवलंबून असते चार विचारांवर *१.विश्वास 2. आदर 3.प्रामाणिकपणा आणि 4. शिस्त.*   *विश्वास*- संघटन मध्ये सर्वच नेतृत्व करू शकतील अस नसत. स्वयंस्फूर्तीने  काही जण संघटन चालवतात त्यांना बळ देणं, त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणे, त्यांना जे दूर दृष्टीने दिसत असते ते यशस्वी करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे असतात. अशावेळी त्या नेतृत्वावर विश्वास हेच सर्वश्रेष्ठ सहकार्य असत.   *आदर*: एकदा विश्वास बसला की एकमेकांना आदर देऊन कार्य पुढे घेऊन जाणे गरजेच असत. आदराने कार्य आनंदात पुढे जाते.  विनाकारण होणारे वाद हे आदरभावनेने टाळले जातात.  *प्रामाणिकपणा*: आपल्यावर ठेवलेला विश्वास हा आपल्या प्रामाणिकपणाच फळ असते. तो टिकवणे आपल्या हातात असते. प्रमाणिकपणा नसेल तर संपूर्ण संघटन तुटू शकते आणि उद्धिष्ट कध...

पव..त..

                        *पव.. त* पव.. त शब्द असा वाचा  व.. थोडा वढुन आणि त लगेच सोडा. पवत अस नाही. पूर्ण महाराष्ट्र मध्ये ही प्रथा आहे की नाही माहीत नाही पण पश्चिम महाराष्ट्रात आहे.  नागपंचमीच्या दिवशी सफेद दोरा घेऊन त्याला हळद लावून पिवळे केले जाते. मग आपले आई तो दोरा हातात बांधते. आणि तसाच एक दोरा मुलींच्या गळ्यात बांधला जातो. याच्या मागे काय शास्त्र आहे माहीत नाही पण आई ज्या प्रेमाने बांधते त्यामुळे तो दोरा नंतर आठवड्यात पुन्हा सफेद झाला तरी तसाच हातात राहतो. ह्या दोऱ्याला पव..त म्हणतात. ह्या पवत्याची मग सवय होऊन जाते. कधी कधी एकांतात दुसऱ्या हाताच्या बोट यात गुंडाळून पव..त तोडायचा प्रयत्न केला जातो पण तुटत नाही.  नागपंचमी दिवशी बांधलेले पवत, सरत्या सोमवारी (म्हणजेच श्रावणातील शेवटचा सोमवार)  काढून नदीत सोडतात. वडील याची आठवण सांगत होते की खास पवत सोडण्यासाठी ते आमच्या महू गावातून राजपुरीच्या डोंगर चढून पलीकडे वाईला उतरत असत आणि कृष्णामाई मधे पावत विसर्जित करून येत असत. सोबत बाजार म्हणून येताना मोठी केळी ...

प्रीतिष रांजणे वाढदिवस

       *🎂💐💐वाढदिवस अभिष्टीचिंतन💐💐🎂*  समजूतदार पणा अंगी भिनलेला असला की व्यक्ती आपसूक एका वेगळ्या उंचीवर पोहचतो. विवीध जबाबदाऱ्या पार पाडत अनुभवाची शिदोरी घेऊन अशा व्यक्ती स्वतःपेक्षा समाजासाठी जास्त झटत असतात. ना कसल्या प्रसिद्धची अपेक्षा ना कसला स्वार्थ. लहान थोर सगळे यांच्या संपर्कात आले की आपलेसे करून करून घेण्याची लकब असलेले  महू गावातील उभरते नेतृत्व, आमचे बंधु आणि त्यापेक्षा जास्त जवळचे वैचारिक मित्र.. विश्वासू सहकारी श्री. प्रीतिष रांजणे यांनां जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐💐🎂🎂🎂

भरत गोळे वाढदिवस शुभेच्छा

*💐🎂🎂💐वाढदिवस अभिष्टीचिंत💐🎂🎂💐* 2021 च्या दुसऱ्या लॉक डाउन नंतर गावाकडे कोणते सण उत्सव साजरे होत नव्हते. पावसाळा चालू होता आणि गोपाळकाला जवळ आला होता. लहान-तरुण पोर या सणाकडे आस लावून बघत होते. गोपाळकाला दिवशी कशीतरी तयारी करून काही मुलं गावच्या मंदिरासमोर दहीहंडी फोडायची तयारी करत होते. पण हवा तसा उत्साह येत नव्हता. त्यांना गरज होती कोणाच्या तरी पाठबळाची, कोणी तरी येऊन cheer up करण्याची. नेमकं याच वेळी  भरत दादा तिथे आले, कोणतंही बंधन न पाळता त्या छोट्या मुलांमध्ये जाऊन नाचू लागले, त्यामुळे मुले ही आनंदली, अनेक दिवसांनी गावातील मुलं अशी उत्सहात नाचत होतीत. *अस योग्यवेळी योग्य action घेऊन आपले नेतृत्वगुण सिद्ध करणारे, सर्वाना सोबत घेऊन चालणारे, त्यांचा शब्द अंतिम मानणारे कार्यकर्ते तयार करणारे, नवीन मंदिराचे होणारे कामात लक्ष देऊन योग्यरितीने पुढे नेणारे उमदा व्यक्तिमत्व श्री.गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. भरत श्रीपती गोळे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा* 🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐 वाढदिवस सेनापतीचा प्रसंग 01: कोरोनाचे वातावरण पावसाळ्याचे दिवस होते, संध्यकळी अंधार पडू लागला आ...

BARC मधील आठवणी

    यादव ची प्रेमाची व्याख्या BARC म्हणजे nuclear scientist काम करतात ती संस्था. भारताचा अणू कार्यक्रम चा शोध आणि योजना इथे तयार होतात. वाशी पुलाच्या पुढे मानखुर्द आणि चेंबूर च्या मध्ये समुद्र किनारी आणि जमिनीकडून डोंगराचे संरक्षण लाभलेल्या विस्तीर्ण  जागेत हा प्रकल्प उभा आहे. आत मध्ये अनके अचंबित करणारया इमारती आहेत. 2008-09 मध्ये मला इथे काम करण्याची संधी भेटली होती. EISD (electronics and instrument service division) मध्ये आम्ही मी आणि माझा सहकारी माने काम करत होतो. आमच ऑफिस मेन गेट पासून 5 6 किमी दूर होत, त्यासाठी गेट पासून मोफत बस सेवा असायची.  तर या आमच्या division मध्ये हेड होते V K chadda. त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं होतं. त्यांच्या हाताखाली यादव, टिकरिया, मिश्रा, चौधरी आणि सिंग असे 5 सायंटिस्ट काम करत होते. सगळे 40 ते 45 वयातील होते फक्त मिश्रा 55 पार होता चड्ड्या त्याला vrs घे म्हणून दबाव आणत होता.(मिश्रा ची गोष्ट पुन्हा कधीतरी) आमचं काम होत यांच्या प्रोजेक्ट ला यांना लागणारी मदत करायची.  त्यात टिकरिया आणि मिश्रा हुषार होते. (सगळेच सिलेक्ट झालेले सायंट...