BARC मधील आठवणी

    यादव ची प्रेमाची व्याख्या
BARC म्हणजे nuclear scientist काम करतात ती संस्था. भारताचा अणू कार्यक्रम चा शोध आणि योजना इथे तयार होतात. वाशी पुलाच्या पुढे मानखुर्द आणि चेंबूर च्या मध्ये समुद्र किनारी आणि जमिनीकडून डोंगराचे संरक्षण लाभलेल्या विस्तीर्ण  जागेत हा प्रकल्प उभा आहे. आत मध्ये अनके अचंबित करणारया इमारती आहेत. 2008-09 मध्ये मला इथे काम करण्याची संधी भेटली होती. EISD (electronics and instrument service division) मध्ये आम्ही मी आणि माझा सहकारी माने काम करत होतो. आमच ऑफिस मेन गेट पासून 5 6 किमी दूर होत, त्यासाठी गेट पासून मोफत बस सेवा असायची. 
तर या आमच्या division मध्ये हेड होते V K chadda. त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं होतं. त्यांच्या हाताखाली यादव, टिकरिया, मिश्रा, चौधरी आणि सिंग असे 5 सायंटिस्ट काम करत होते. सगळे 40 ते 45 वयातील होते फक्त मिश्रा 55 पार होता चड्ड्या त्याला vrs घे म्हणून दबाव आणत होता.(मिश्रा ची गोष्ट पुन्हा कधीतरी) आमचं काम होत यांच्या प्रोजेक्ट ला यांना लागणारी मदत करायची. 
त्यात टिकरिया आणि मिश्रा हुषार होते. (सगळेच सिलेक्ट झालेले सायंटिस्ट हुषार नसतात हे मला तिथे समजलं) चौधरी सिनिअर होता त्याचे प्रोजेक्ट मेन  न्यूकलीअर रिएअक्टर वर होते, त्याने मला त्या कामात घेतले होते. त्यामुळे मला मुख्य रिऍक्टर बघायला भेटला होता. 
त्यासोबत यादव ही मला कधी कधी बोलवायचा. 
यादव मस्त मौला माणूस होता. जीवन कस निवांत जगायचं हे त्याला बघून कळायचं. त्याच आणि सिंग च केबिन एकच होत.  सकाळी ऑफिस मध्ये पोहचल की टेबलवर news पेपर पूर्ण उघडून एक एक बातमी वाचायची. मग त्यावर सिंग आणि त्याची चर्चा व्हायची. मग बातमी कोणती ही असो त्याची मते बिनधास्त मांडणार. गुन्हेगारी, दरोडे, राजकारण, गँगवार, प्रॉपर्टी यासर्वांवर निवांत फड रंगायचा.  आम्हाला काहीतरी कामासाठी बोलवले असायचे ते बाजूला राहायचे आणि आमचे ही 2-3 तास तिथेच जायचे. सुरवातीला आम्ही नवीन असल्यामुळे थोडं संकोचून बसायचो पण नंतर आम्ही पण बोर झालो की चल यादव कडे जाऊ अस बोलून तिथं निवांत बसायचो. तिथे कामाचे शिकलो नाही पण जनरल knowldge खूप भेटलं. 
असच एक दिवस आम्ही चोघे यादव च्या केबिन मध्ये बसलो होतो.  पेपर वाचताना यादव ने बातमी वाचली की प्रेमात दोघांनी पळून जाऊन जीव दिला. 
*बातमी वाचून यादव ने वर बघितले आणि आम्हाला विचारले "ये प्यार व्यार क्या होता है. हमे तो कभी महसुस नही हुआ ऐसा कुछ. बस अपनी जरूरत पुरी होती है वो हमे अछा लगता गया." पढाई की तो ऐसा लगा नोकरी हमरा प्यार है, फिर शादी हुई तो लगा ये प्यार है, फिर बचचे हो गये तो वो प्यार लगा.सबकी फिकीर हम करते है, वो हमरा करते है,  लेकिन ये प्यार का अहसास कभी हुआ नही.  ये प्यार व्यार कुछ नही होता, मन की खुशी के लिये जो अछा लगे वो करो वो प्यार है.* आम्ही ते ऐकून एकटक यादव कडे बघत होतो, त्याचे शब्द असे कानात घुसत होते. प्रेम वैगरे यामागे पळून जीवन बरबाद करू नका. काळजी, आदर, आनंद देणे हेच प्रेम असते हे त्याच्याकडून समजले.

आज तुमचा लेख वाचून यादव आठवला आणि हळूहळू ते सर्व दिवस आठवले. 
धन्यवाद
जयंत जगताप


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)