छावा
#सिनेमागल्ली #छावा #सर्वोत्तम कलाकृती सर्वप्रथम लक्ष्मण उतेकर साहेबाना लाख लाख मुजरा. 1. शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी वाचताना मनात अनेक काल्पनिक चित्र उभी राहत असत. महाराज असे लढले असतील, तसे घोड्यावर बसत असतील, दरबार कसा असेल असे अनेक प्रश्न आणि कल्पनाचित्र मनात उभी राहत असत. 2. कॉलेज मध्ये असताना अनेक हॉलिवूड चे इतिहासिक सिनेमे पाहून, त्यांचे मोठे सेट, larger then लाईफ असे कॅनव्हास बघून मनात राहून राहून प्रश्न यायचा आपल्या राजाचा इतिहास असा मोठा कधी बघायला भेटेल. 3. व्हॉट्स वर 2013 साली संभाजी 1689 सिनेमाची अनेक तरुण जाहिरात करत असत पण त्याला रिलीज करायला परवानगी भेटत नव्हती. त्यातून आम्ही अखंड हिंदू राष्ट्रपुरुष असा ग्रुप ही तयार केला होता. वरील सर्व अधुऱ्या प्रश्नांची, स्वप्नांची उत्तर म्हणजे लक्ष्मण उतेकर यांचा छावा. सर्वोत्तम कास्टिंग आहे यातच त्यांचा अभिनय किती दमदार आहे ते समजत आहे. नावाप्रमाणे सिनेमात काय दाखवायचे ते स्पष्ट होते त्यात आजच्या समाजाला देखील शिकवण म्हणून 6th सेन्स वापरला आहे. तो म्हणजे शंभूराजे स्वप्नात आपल्...