छावा

#सिनेमागल्ली
#छावा 
#सर्वोत्तम कलाकृती
सर्वप्रथम लक्ष्मण उतेकर साहेबाना लाख लाख मुजरा. 
 1. शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी वाचताना मनात अनेक काल्पनिक चित्र उभी राहत असत. महाराज असे लढले असतील, तसे घोड्यावर बसत असतील, दरबार कसा असेल असे अनेक प्रश्न आणि कल्पनाचित्र मनात उभी राहत असत.
2. कॉलेज मध्ये असताना अनेक हॉलिवूड चे इतिहासिक सिनेमे पाहून, त्यांचे मोठे सेट, larger then लाईफ असे कॅनव्हास बघून मनात राहून राहून प्रश्न यायचा आपल्या राजाचा इतिहास असा मोठा कधी बघायला भेटेल. 
3. व्हॉट्स वर 2013 साली संभाजी 1689 सिनेमाची अनेक तरुण जाहिरात करत असत पण त्याला रिलीज करायला परवानगी भेटत नव्हती. त्यातून आम्ही अखंड हिंदू राष्ट्रपुरुष असा ग्रुप ही तयार केला होता. 
वरील सर्व अधुऱ्या प्रश्नांची, स्वप्नांची उत्तर म्हणजे लक्ष्मण उतेकर यांचा छावा. 
सर्वोत्तम कास्टिंग आहे यातच त्यांचा अभिनय किती दमदार आहे ते समजत आहे.  नावाप्रमाणे सिनेमात काय दाखवायचे ते स्पष्ट होते त्यात आजच्या समाजाला देखील शिकवण म्हणून 6th सेन्स वापरला आहे. तो म्हणजे शंभूराजे स्वप्नात आपल्या आईला आवाज देत असत आणि त्यांना प्रतिसाद देत वडील छत्रपती शिवाजीमहाराज त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तर देत असत. कशाप्रकारे पाठीवर वार करणारे, अंधारात घात करणारे, तुमच्या प्रगती वर जळणारे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण समाजाशी गद्दारी करत राहणार हे महाराज थोडक्या शब्दात सांगत शंभू राजेना धीर देत असतात. हे आजच्या काळात ही लागू होते आणि अशा अंधाऱ्या गुहा कधीच संपणार नाहीत हे सांगतात. इथेच सिनेमा सर्वोत्तम ठरतो. 
 महाराजांची ताकत, हळवं मन, करारी बाणा पहिल्याच लढाईत दिसतो. 
लोकांना जपणे, कलागुणांना वाव देणे आणि मैत्री कशी जपावी हे कवी कलश बरोबर दृढ होणाऱ्या मैत्रीतून दिसतो. स्वराज्य वाढवताना कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अर्धांगणी किती महत्वाची हे येसूबाईनी दाखवून दिले आहे. 
नवरा बायकोतील नात शेवटी फक्त जगदंब.. जगदंब शब्दातून मनात घर करून राहत.
एकंदरीत आजच्या काळासाठी शिकवण म्हणजे आपल्यात कोण लीडर आहे, कोण नेतृत्व करू शकतो, दूरदृष्टी कोणाची ते ओळखा आणि त्यांना साथ द्या. माझच खरं माझच खरं आणि मीच शहाणा अशा वृत्तीने आणि वयक्तिक स्वार्थामुळे आपल्या आपले राजे काळच्या आधी गमवावे लागले, आजही आपल्यात जे कोण समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी झटत असतील त्यांना साथ देणे हाच आपला स्वराज्यधर्म आहे.  

शेवटी उतेकर साहेबाना विनंती असेच अजून, बाजीराव पेशवे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, महाराणी ताराराणी यांच्यावर असे भव्यदिव्य सिनेमे काढा.

जय शिवराय, जय शंभूराजे , जय भवानी. 

लेखक जयंत जगताप

Last dialogue of Chhava movie
...
Going to hurt your enemies
The victory of the mind is the defeat of the mind
Shame on those who lost without fighting

Shame on those who don't dream
The right to dreams is our real right

Do something for the sake of our own people today.
Swaraj has to make us immortal

You are the red of the clay, no pebbles or dust
You will change the time and write history, don't forget

You are the first star of dawn, a slogan of change
This darkness is for a moment, then everything is yours.

Going to hurt your enemies
We said we are salt, Maharaj

You are not salt but sandalwood, you are the poet of our forehead.
Poetry ended Raje, at last the victory is yours

You will be the ghost of the people, you will be the shining sunlight.
May Goddess Jagdamba and Chhatrapati be happy.
O companion O Sambha

We are salt king, we are salt
You are not salt but sandalwood, you are the poet of our forehead. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)