Posts

Showing posts from March, 2021

विलास जगताप वाढदिवस

"प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे"  प्रामाणिक पणे आपले काम करत राहिले की नशीब ही आपली साथ देते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले सर्वांचे लाडके, मनमिळाऊ, मितभाषी असे व्यक्तिमत्व *श्री. विलास वसंत जगताप.*  महू या आपल्या जन्म गावी राहून संपूर्ण शिक्षण गावीच पूर्ण केले. कॉमर्स मध्ये शिक्षण झाले आणि वडिलांनी म्हणजे आप्पांनी प्रतापगढ साखर कारखान्यात नोकरीला लावले. आपले गाव न सोडता, नोकरी करत करत  विलासदादा श्री गणेश मित्र मंडळाचा एक अविभाज्य घटक झाला होता. मांडला मध्ये नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवणे, आगळे वेगळे गणपती आरास करणे, विविध चित्र रेखाटने, मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे हे करून महू च्या गणेश उत्सव ची शान भागात वाढत होती. नोकरी करत, शेती करत, गावात सांस्कृतिक क्रांती घडवत, विलासदादा आणि त्याच्या मित्रांनी गावच्या पापड कारखान्यासाठी बांधलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये  व्यायाम शाळा चालू केली होती.  साखर कारखाना अजून नीटसा चालू होतं नव्हता आणि मिळेल त्या कामात स्वतःचे 100 टक्के देणाऱ्या विलासदादा ला असे काम न करता राहणे जमत नव्हते. कारखाण्यावरची नो...

हे सीरियस काय असत

हे सिरीयस म्हणजे काय असत जे झालं त्याच डिपॉझिट फसत जगायचं असत नेहमी मस्त, नाहीतर जिंदगी होते स्वस्त  म्हणून जगा होऊन मस्त मस्त, हे सिरीयस म्हणजे काय असत।

शाळा

              शाळा शाळा म्हणजे शाश्वत लळा,  (शाश्वत मधला शा आणि लळा मधला ळा) आयुष्यभर आठवत राहतात मैत्रिच्या गोड झळा. आठवली शाळा की वाहतात आनंदअश्रू खळखळा, शाळेत असताना घंटा वाजली की सर्व जण बोलायचे चला घरी पळा, पण आज दिसली शाळा की मन म्हणते अरे लेका... परत शाळेकडे वळा, परत शाळे कडे वळा शाळा म्हणजे मित्रांचा शाश्वत लळा                            -सौ मनोरमा जगताप