विलास जगताप वाढदिवस
"प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे"
प्रामाणिक पणे आपले काम करत राहिले की नशीब ही आपली साथ देते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले सर्वांचे लाडके, मनमिळाऊ, मितभाषी असे व्यक्तिमत्व *श्री. विलास वसंत जगताप.*
महू या आपल्या जन्म गावी राहून संपूर्ण शिक्षण गावीच पूर्ण केले. कॉमर्स मध्ये शिक्षण झाले आणि वडिलांनी म्हणजे आप्पांनी प्रतापगढ साखर कारखान्यात नोकरीला लावले. आपले गाव न सोडता, नोकरी करत करत विलासदादा श्री गणेश मित्र मंडळाचा एक अविभाज्य घटक झाला होता. मांडला मध्ये नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवणे, आगळे वेगळे गणपती आरास करणे, विविध चित्र रेखाटने, मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे हे करून महू च्या गणेश उत्सव ची शान भागात वाढत होती. नोकरी करत, शेती करत, गावात सांस्कृतिक क्रांती घडवत, विलासदादा आणि त्याच्या मित्रांनी गावच्या पापड कारखान्यासाठी बांधलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये व्यायाम शाळा चालू केली होती.
साखर कारखाना अजून नीटसा चालू होतं नव्हता आणि मिळेल त्या कामात स्वतःचे 100 टक्के देणाऱ्या विलासदादा ला असे काम न करता राहणे जमत नव्हते. कारखाण्यावरची नोकरी सोडून तो मुंबईला आपले नशीब अजमावयाला निघाला. मुंबईत येऊन भेटलं ती नोकरी करण्याची त्याची जिद्द आणि तयारी होती. सुरवातीला एक लॉटरी च्या दुकानात नोकरी लागली, ती करत असतानाच कोपरखैरणे मध्ये डी-मार्ट चा मॉल चालू होतं होत. तरुण मुलांची तिथे गरज होती, तिथे मुलखात दिली डी-मार्ट मध्ये नोकरी लागली. बीकॉम असूनही, कोणतही काम करण्याची तयारी आणि 100 टक्के मेहनत च्या जोरावर विलासदादा आज डी मार्ट मध्ये मोठ्या पदावर पोहचला आहे. यश मिळत गेले तरी जमिनीवर घट्ट पाय रोवून तो सर्वांचा आवडता, आदर्श असे व्यक्तिमत्व बनला आहे.
आज ह्या महू गावाच्या कर्तृत्ववान तरुणाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. विलास जगताप यांना लाख लाख शुभेच्छा.
Comments
Post a Comment