Posts

Showing posts from July, 2020

ग्राम प्रशासक नेमणूक

महोदय,         सध्या भारतात वाढत असलेल्या कोरोना संकटामुळे, राज्यसरकारने आपल्या राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका प्रक्रिया स्थगित केल्या आहेत.  तोपर्यंत गावचा विकास साधण्यासाठी आणि प्रशासकीय काम पाहण्यासाठी आपल्या सहमतीने प्रशासक नेमायचा आहे.    महू गावात सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपणास विनंती करतो की, प्रशासक या पदासाठी श्री. विठ्ठल दगडू गोळे याना नियुक्त करावे. श्री विठ्ठल गोळे याना सरपंच या पदाचा 15 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या कार्यकाळात गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्यांना स्वच्छ ग्राम अभियान आणि घरोघरी सौचलाय बांधण्याच्या कामात केलेल्या अतुलनीय कामगिरी साठी तत्कालीन दिवणंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. सध्याच्या अवघड काळात देखील त्यांनी गावाला सहकार्य करून संचारबंदी यशस्वी केली आहे. गावातील तंटे, आपापसातील वाद मिटवण्यासाठी विठ्ठल गोळे यांच्या शब्दाला प्रमाण मानले जाते. तसेच गावात स्थानिक सरपंच निवड सर्व सहमतीने बिनविरोध करून गावातील गटबाजी नाहीशी केली आहे. आपण देखील वरील सर्व गोष्ट...

मेढा AR ऑफिस

प्रति, ______________________________ विषय : सहयाद्री सहकारी पर्यटन सेवा संस्थेस  नोंदणी करण्यास ना-हरकत पत्र महोदय,  जावळी तालुक्यातील महू धरणावर नोंदणीकृत असलेली संस्था–____________________________ ही माझ्या मार्गदर्शनाखाली झाली होती. या संस्थेचा मी संस्थापक असून, सध्या ही संस्था कार्यरत नाही.  जावळी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त कार्यकर्ते, स्थानिक रोजगार निर्मितीसाठी माझ्या मार्गदर्शनखाली सहयाद्री  सहकारी पर्यटन सेवा संस्था स्थापन करत आहेत.  या संस्थेस योग्य सहकार्य करून ही संस्था नोंदणीकृत करावी ही विनंती.  कळावे                                                  आपले विश्वासू                                    मा. आमदार श्री. शशिकांत शिंदे 

श्री गणेश मित्र मंडळ - एक सामाजिक ओढ असलेलं आणि कर्तृत्ववान मंडळ

*💐💐💥🐅🐅श्री गणेश मित्र मंडळ - एक सामाजिक ओढ असलेलं आणि कर्तृत्ववान मंडळ💐,😎💥 लॉक डाउन चा उपयोग गावच्या विकासात आणि सामाजिक कार्यात अतिशय योग्य पद्धतीने करून श्री गणेश मित्र मंडळाने एक नवीन आयाम घालून दिला आहे.  उन्हळयात, गावच्या पिण्याच्या पाण्याच्या जुनी पाईप लाईन होती काढून आणली आणि गावचे एक मोठे काम मंडळाने फक्त 2 दिवसात पूर्ण केले.  पाऊस चालू झाला, पेरणी झाली, शेतीची इतर कामे संपलीत आणि आषाढी जवळ आली.  तसे *श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री भरत श्रीपती गोळे*  यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की, काळ भैरवनाथ मंदिर जे गावचे एक पुरातन मंदिर आहे आहे आणि गावची शान आहे त्याचे डागडुजी आणि रंग काम केले तर मंदिर अजून मजबूत *विशेष सहकार्य लाभले ते   विठ्ठल नामदेव गोळे, (बाबा) अमोल सर्जेराव गोळे, रोहिदास बबन गोळे, संपत सखाराम गोळे, सुनील सखाराम गोळे, गणेश लक्षुमन गोळे, आत्माराम राजाराम गोळे, कृष्णात विठ्ठल गोळे, अविनाश विलास खुडे, वैष्णव प्रकाश पंडित, सुधीर मारुती गोळे, प्रमोद मनोहर गोळे, आणि मंडळाचे सर्व जिगरबाज कार्यकर्ते.*  श्री विठ्ठल गोळे(अण्णा) ...

हाकमारी

                           हाकमारी 1980 ते 2005 साला पर्यंत, गावाकडे मोबाइल चे पेव कमी होते, पोर मैदानी खेळ जास्त खेळायचे आणि सांधकाळी लपाछपी अबदबी, क्रिकेट असे खेळ जास्त खेळायचे.  रात्र झाली की अंगणात अंथरून पडायची आणि त्यावर गप्पांचे फड रंगायचे. सगळे जण मस्त अंधारात गप्पा मारून मग आभाळाकडे डोळे लाऊन चांदण्या तारे मोजत झोपी जात असत. सकाळी उठून गवत पेटवायचे आणि जो उशिरा येईल त्याला त्याची म्हातारी म्हणजे चगाळ आणावे लागायचे.  लहान मुले 5 ते 12 वर्षातील काही न काही खुडबुड करत असत, एकमेकांना आवाज द्यायचे, खोड्या काढायच, चिडवायचे असे करून म्हाताऱ्या माणसांची झोप मोड करायची.  हे पूर्ण बंद तर करू शकत नव्हते पण कमी करण्यासाठी म्हातारे आजी आजोबा एक गोष्ट सांगायचे. हाकमारी येणार आहे अशी.  सगळे झोपले की अंधारात एक बाई येते, ती सफेद साडी घालते, (तशी सगळी भुते अंधारात येतात पण सफेदच कपडे का घालतात किंवा त्यांचे केस सफेद का असतात हे कोडंच आहे.) ते बाई असते हाकमारी, ती आपल्या घरातील कोणाच्याही आवाजात आपले नाव घे...