हाकमारी
हाकमारी
1980 ते 2005 साला पर्यंत, गावाकडे मोबाइल चे पेव कमी होते, पोर मैदानी खेळ जास्त खेळायचे आणि सांधकाळी लपाछपी अबदबी, क्रिकेट असे खेळ जास्त खेळायचे.
रात्र झाली की अंगणात अंथरून पडायची आणि त्यावर गप्पांचे फड रंगायचे. सगळे जण मस्त अंधारात गप्पा मारून मग आभाळाकडे डोळे लाऊन चांदण्या तारे मोजत झोपी जात असत. सकाळी उठून गवत पेटवायचे आणि जो उशिरा येईल त्याला त्याची म्हातारी म्हणजे चगाळ आणावे लागायचे.
लहान मुले 5 ते 12 वर्षातील काही न काही खुडबुड करत असत, एकमेकांना आवाज द्यायचे, खोड्या काढायच, चिडवायचे असे करून म्हाताऱ्या माणसांची झोप मोड करायची.
हे पूर्ण बंद तर करू शकत नव्हते पण कमी करण्यासाठी म्हातारे आजी आजोबा एक गोष्ट सांगायचे. हाकमारी येणार आहे अशी.
सगळे झोपले की अंधारात एक बाई येते, ती सफेद साडी घालते, (तशी सगळी भुते अंधारात येतात पण सफेदच कपडे का घालतात किंवा त्यांचे केस सफेद का असतात हे कोडंच आहे.) ते बाई असते हाकमारी, ती आपल्या घरातील कोणाच्याही आवाजात आपले नाव घेऊन हाक मारेल आणि आणि तिच्या हाकेला जो हाक देईल त्याला ती घेऊन जाणार किंवा आपण आपसूक तिच्या मागे चालायला लागणार. हे ऐकून मुले एकदम शांत बसायची, मग कोणीही आवाज दिला तरी इकडून चिडीचूप होईन जोपायचीत.
आता अंगणात झोपणे कमी झाले, ती मस्ती कमी झाली आणि हाकमारीही येणे बंद झाले.
हाकमारी ची गोष्ट ज्यांनी ऐकली आहे त्यांनी प्रतिक्रिया द्या.
Comments
Post a Comment