Posts

Showing posts from June, 2024

गणेश मंडळ मीटिंग 30 जून 2024

आजच्या मीटिंग मध्ये चर्चा झालेले मुद्दे खालील प्रमाणे.  1. सर्व मंडळाच्या सभासदांनी मंडळाची वार्षिक वर्गणी रुपये 500 जमा करणे. ज्यांची शिल्लक असेल त्यांनी कृपया लवकरात लवकर जमा करणे.  2. बँक मध्ये मंडळाचे नावाने खाते खोलने - गावी.   3. प्रतेक कार्यासाठी leader तयार करणे. फंड चालवणे, वर्गणी जमा करणे यासाठी.  4. मंडळाचा अंतर्गत cricket club तयार करणे. त्यासाठी सध्या 4 टीम तयार करायचे आहेत. टीम तयार करण्यासाठी अक्षय सुभाष गोळे व अजिंक्य मच्छिंद्र शिंदे, अनिकेत आत्माराम गोळे व  अंकुश शिंदे सर्वांशी संपर्क करतील व टीम तयार करतील.  5. गणेशऊत्सवा निमित्त ज्यांना स्वइच्छेने देणगी द्यायची आहे त्यांनी आपली नावे लवकरात लवकर द्यावीत.  सर्वांनी मीटिंग मध्ये सक्रिय भाग घेऊन 6. गणेशउत्सव टीशर्ट संदर्भात चर्चा करून लवकरात लवकर तयारी करणे.  7.मंडळाचा फंड  रुपये 100 प्रत्येकी चालू करायचा आहे. यासाठी प्रत्येक महिन्याचा 10 तारखेनंतर येणार रविवारी कोपरखैरणे मध्ये मीटिंग होईल.  *पुढील मीटिंग रविवारी 14 जुलै रोजी होईल.* त्या दिवशी फंड चालू करण्यात येईल. त...

कधी कधी स्वतचं स्वताची पाठ थोपटून घेत राहायचं असत...

आजकाल अनेक शालेय कॉलेज विध्यार्थी अपयश आले की टोकाचा विचार करतात आणि आत्महत्येचा विचार करतात किंवा घरदार सोडून जातात अशा विद्यार्थ्यांना उभारी देणारी कविता सुचली.. ती इथे मांडतोय..  नक्की दाद द्या..  कधी कधी स्वतचं स्वताची पाठ थोपटून घेत राहायचं असत,  कधी कधी स्वतचं स्वताची पाठ थोपटून घेत राहायचं असत...  स्वतचं स्वतचं मन ओळखयाच असत..   उन्हात चालता चालता स्वतचं स्वतच्या सावलीत उभ राहायचं असत..  अंतिम ध्येय हे जगत राहणं असत.. म्हणून चालायचं थांबायचं नसतं..  कधी चढ कधी उतार.. कधी यश कधी अपयश चाखायच असत.. तेव्हा कुठं जीवन मधुर होत असत..  हरलो म्हणून थांबायचं नसतं.. मावळतीचा सूर्य पुन्हा लख्ख प्रकाश घेऊन उगवत असतो त्याला साक्ष ठेऊन आपण ही चमकायच असत..  जाणार तर इथून प्रत्येकजण आहे.. त्या वेळेत आपला ठसा उमटवत राहायचं असतं..  कधी कधी स्वतचं स्वताची पाठ थोपटून घेत राहायचं असत...  कवी  जयंत जगताप..

आरक्षण

          *आरक्षण कोणाला असायला हवे* 2000 च्य काळात जेव्हा आम्ही 10वी ला होतो तेव्हा आम्हाला आमची जात 10 वी पर्यंत माहीत नसायची. शाळेत तर हेच शिकवलं जायचं की सर्व मानव समाज एक आहे. सर्व जाती-धर्म सामान आहे. मग leaving certificate वर लिहून यायचं धर्म आणि जात. बरं आम्हाला घरात ही असली शिकवण नसायची की आपण अमुक आणि तमुक जातीचे.   मग जस कॉलेज admission चालू झाले की या आरक्षण रुपी वृक्षाचे विषारी फळे चाखायला भेटायची. या आरक्षणाच्या झाडावर अशी व्यवस्था केली आहे की तुम्ही की हुषार असा किंवा नसा पण जर तुमची जात नसेल तर तुम्हाला खालीच ठेवले जाते. जात असली की शिडी लाऊन आरक्षण रुपी झाडावर चढवले जाते. आणि तिथून पुढे गुणवत्ता नसली तरी वर वर शिड्या दिल्या जातात.  बरं घटनेनुसार काही काळ  हे आरक्षण योग्य होते कारण काही दुर्बल घटक प्रवाहात आणणे गरजेच होत. जर आता त्या दुर्बल घटकातील बहुतांश समाज प्रवाहात आला असेल तर  त्यांनी हा लाभ घेणे बंद केले पाहिजे आणि आता जे अजूनही या लाभापासून वंचित आहेत त्यांना आरक्षण लाभ भेटला पाहिजे. जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना ...

भावकी

                 *भावकी* काही लोक म्हणतात भावकी लय वाईट.. नको तिथं अडवतात.. आमच्या कर्यातच अडवतात.. आम्हाला एकट पाडतात... शासन करतात, दंड ठोकतात.. भावकी बाहेर टाकतात..     अरे लेका भावकी बनते ती भावा-भावाच्या एकितून, सहकार्यातून, एकमेकांना अवघड काळात केलेल्या मदतीतून आणि आनंदक्षणी एकत्र होऊन केलेल्या जल्लोषाने.. जस आपण देशाचे, समाजाचे देणे लागतो तस भावकीचे पण देणे लागतो. जर आपण आपल्या भावासाठी भावकिसाठी झटलो तर भावकी तर झटनारच.. पण कोणी वाकडी नजर केली तर आपल्या साठी पहिली उभी राहणार.. पण भावकी फक्त आपल्या स्वार्था साठी वापरली आणि तिला गृहीत धरले तर ती दुरावते..म्हणून पाहिलं आत्मपरीक्षण करावं.. आपण किती प्रामाणिक आहे हे ओळखावं.. जर आपला जिव्हाळा खरा असेल, नुसता दिखावा नसेल तर भावकी आपलीच असते. ती आपल्या जिवाभावाची असते.. तिला जपावं, टिकवाव... तिचा सन्मान जपावा.. त्यातून मिळेल आत्मविश्वास, प्रेम, आपुलकी, सन्मान.. म्हणून भावकी जपा.. ती तुम्हाला जपेल...  जयंत जगताप

*सहनशीलता, आदर, विश्वास आणि क्षमा*

     *सहनशीलता, आदर, विश्वास आणि क्षमा*  मागच्या आठवड्यात दिलीप दादाना आपलं मुंबई मंडळ भेटायला गेलो एक छान मासिक वाचनात आल. त्यातील एक गोष्ट खूप आवडली. ती अशी  एक गाव असतो. गावात खूप हुशार, कर्तबगार अशी मंडळी असतात पण गावचा हवा तसा विकास होत नसतो. आजूबाजूची लहान लहान गाव चांगली प्रगती करत असतात. या गावात नेहमी आपापसात वाद, तंटे होत असतात. एकाने काही काम हातात घेतले की दुसऱ्याने त्यात खोडा घालायचा, दुसऱ्याने काही चालू केले की पाहिल्याने त्यात अडथळे आणायचे. सहमत कुठे होत नसे आणि यात गाव मागे पडत होता. हव्या तशा योजना येत नव्हत्या. एक दिवशी गावात एक साधू येतात. सरपंच त्यांचं स्वागत करतात सर्व पाहुणचार करतात. साधू दोनचार दिवस राहतात आणि निघायची तयारी करतात. तेव्हा न राहून सरपंच त्यांना प्रश्न विचारतात "महाराज, गावात खूप तंटे होत असतात एकी नाहीये यावर काही उपाय सांगा." महाराज म्हणतात: "मला असेल फालतू प्रश्न विचारू नका". यावर  इतकावेळ शांत असलेले सरपंच चिडतात आणि महाराजांना खूप काही बडबडतात. अगदी त्यांची लायकी काढतात. गाव आमचा आहे तुम्हाला काय माहित कसा चालतो ते ...

समिष्टीसाठी काहीही

               समिष्टिसाठी काहीही      मला  वडिलांकडून मिळालेला  एक सल्ला म्हणजे, वाद भांडण जेवढे टाळता येतील तेवढे टाळावे. जरी परिस्थिती विपरीत असेल तरी मध्य मार्ग काढायचा प्रयत्न करावा. मी ही त्याच तत्त्वावर चालत असतो. अनेक वेळा समिष्टी करायचा प्रयत्न करत असतो. भले थोडा तोटा झाला तरी चालेल परंतू नाती तुटता कामा नये. पण कधी कधी ही माघार आपली कमजोरी समजली जाते, विनंती करून करून आपण थकून जातो पण आपल्याला दाद दिली जात नाही. अनेक मीटिंग करून आपण मध्य मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो त्यातून समोरच्याला ते पटत पण  जेव्हा तिसरा व्यक्ती सोबत ते चर्चिले जाते तेव्हा ते निर्णय परत फिस्कटले जातात. आणि समोरचा शब्द पाळत नाही, आपण कितीही मीटिंग लावायचा प्रयत्न केला तरी आपल्याला दाद तर सोडाच पण गृहीत ही धरले जात नाही.   मग काही गोष्टीत आपली ताकत आणि नियोजन दाखवावे लागते. हे करून विजय प्राप्त झाला की मग सुरू होते ती आपली बदनामी. बरं जवळचे बदनामी करून विसरून जातात आणि परत जवळ ही येतात. मात्र काही समाज कंटक या तथाकथित बदनामीचा फायदा...

आपल्यानंतर पुढे काय?

*आपल्यानंतर  पुढे काय?* आपलं बाळ दिव्यांग झालं की प्रतेक आई वडिलांना अगणित प्रश्नांची उत्तर शोधावी लागतात. बाळ स्वतंत्रपणे चालेल.का? बोलेल का? त्याच्या गरजा ते कस सांगेल? सुसू, शी..ला झाले तर कस सांगेल? स्वतः जेवेल का? जसा कर्णकर्कश भोंगा सतत कानात घोंगवतो तसा एक विचार  डोक्यात  सतत घोंगावत असतो तो म्हणजे,  आपल्या नंतर कोण आधार देईल? कोण याची काळजी घेईल? दिव्यांग पालकांना हा प्रश्न सतावतो तर विचार करा ज्या बाळाचे आई वडील त्या दिव्यांग जीवाला असेच वाऱ्यावर सोडून गेलेत आणि त्याची जबाबदारी आईंचे आईवडील म्हणजे आजी आजोबा घेत आहेत, त्यात ते आता थकले आहेत, त्यात दिव्यांग बाळ सेरेबाल पालसी असलेली मुलगी.. 13 वर्षाची मुलगी.. असेल तर त्यांना काय वाटत असेल?. ही गोष्ट आहे त्या जान्हवी कारंडे ची आणि डोंगरा एवढा आधार झालेल्या तिच्या आजी आजोबांची.  जन्मताच सेरेबल पल्सी झालेली जानवी कसा तरी जगायचं प्रयत्न करत होती. कुठेतरी तग धरत होती. पण तिच्या नशिबात तिच्या आईवडिलांचा आधार नव्हता.  तिच्या आई वडिलांना हा धक्का सहन झाला नाही आणि जानवी ला तिच्या हालता मध्ये सोडून गेले. देवाघ...

सहयोगी नी चे यश

     सहयोगीने चे यश. 10 वर्षा पूर्वी दिव्यांग मुलांच्या पालकांनी मिळून दिव्यांग मुलांसाठी संस्था सुरू केली. संस्थेचे मूळ उद्देश समाजातील कमजोर, गरीब घटकातील दिव्यांग मुलांना उपचार मिळावेत ज्यांना गरीब परिस्थिती मुळे विविध थेरेपी घेता येत नाहीत त्यांना त्या थेरेपी मिळवून उपलब्ध करून देणे. यासाठी अशा गरीब कुटुंबपर्यंत पोचने आवश्यक होते. त्यासाठी संस्थेमधील सदस्य सुधीर  कोपरखैरणे घणसोली परिसरात सर्वे करत असताना त्यांना श्यामलता पांडे यांचं कुटुंब निदर्शनास आले.  श्यामलता ही छत्तीसगढ मधील सर्गुजा गावची तर नवरा   सभाजित पांडे हे बनारस उत्तर प्रदेश चे रहिवाशी. लग्न करून दोघे पोटापाण्यासाठी 30 वर्षापूर्वी मुंबईत आले.  सभजित हे लांड्री कंपनीत कपडे धूने चे काम करत असत तर श्यामलता घर सांभाळत. लवकरच त्यांना धरती नावाची गोंडस मुलगी झाली. सर्व काही व्यवस्थित चालू होते. तिघांचं संसार आनंदात चालू होता. काबाड कष्ट करून सभाजीत घर चालवत होता आणि शांमलाता त्याच मेहनतीने घर सांभाळत होती. काही वर्षांनी दुसरी  मुलगी जन्माला आली अंजली. अंजली जन्मताच अपंग जन्मली. पण...

नशिबाचे खेळ

नशिबाचे खेळ कधी कधी नशीब आपल्यासोबत असा खेळ खेळते की देव देखील त्याला टाळू शकत नाही.. आपले शिक्षण, आपले प्रयत्न, आपले अथक परिश्रम, आपली श्रद्धा सर्व कसोटीवर लागते पण यश काही हातात येत नाही. तरीही सकारात्मक कसे राहावे हे ज्यांच्यकडून शिकायला भेटते अशा सौ शुभांगी अमित कदम यांची ही कहाणी. स्वतः पेशाने फार्मासिस्ट वडील शिक्षक, घरात सर्व सुशिक्षित. नवरा ड्राफ्ट्समन. विवाह नात्या मध्ये नाही झाला, दोघांचे ब्लड ग्रुप पण वेगळे. सासू सासरे देखील प्रेमळ. नवऱ्याला फक्त मधुमेहाचा त्रास वयाच्या १३ व्या वर्षा पासून आहे. त्याची औषध सुद्धा चालू होतीच. सर्व काळजी घेऊन देखील मोठ्या मुलाचा चिन्मयचा जन्म १ महिना लवकर झाला. डिलिव्हरी नॉर्मल झाली परंतू जन्मताच तो रडला नाही. इथेच मनात पाल चुकचुकली आणि नको ते झालं. बाळ दिव्यांग आहे हे पुढे जाऊन समजले. त्याला हळूहळू मोठ करत असताना हार मानतील त्या शुभांगी ताई कसल्या. अनेक डॉक्टरनी सांगितले होते की एकाला दोघे असतील तर दिव्यांग मुलाची बुद्धीची वाढ होण्यात मदत होते. पहिल्या वेळेचा अनुभव पाठीशी होता. यावेळी सर्व काळजी घेऊन, सर्व आवश्यक टेस्ट करून दुसऱ्या बाळाला जन्म...

एक विचार आणि योग्य एकता

   *एक विचार आणि योग्य एकता* कालच्या निकालाने स्पष्ट केले की जे फक्त स्वतसाठी जगतात आणि स्वार्थाने बरबटलेले असतात ते कोणाचेही नसतात. स्वाभिमान, आत्मसन्मान, देशाभिमान, देशसेवा अशा गोष्टी हे लोक पायदळी तुडवतात..  अशासाठी पक्ष, समूह हा फक्त स्वतच्या फायद्यासाठी असतो. ज्यांनी भूतकाळात यांना अपमानित केलेलं असते अशांच्या मांडीला मांडी हे लाऊन बसतात. आणि समहू कडून स्वतच्या अपमानाचा बदला घेतला जावा अशी अपेक्षा करतात. असे डब्बल ढोलकी विचारधारा ही विरोधी विचारधारे पेक्षा घातक असते. याचाच परिणाम कालच्या निकालावर दिसत आहे.  अशी विचारधारा देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि अगदी गाव पातळीवर सुद्धा असते..  एखाद्या समहुने कितीही एकीचे प्रयत्न केले तरी अशी विचारधारा अगोदर बाद करणे आवश्यक असते. त्यासाठी ठराविक पण योग्य विचारधारा एक होणे गरजेचे आहे आणि लेचीपेची स्वार्थी वृत्ती वाले त्यांच्या वृतीनुसार त्या पायरीवर ठेवणे गरजेचे असते.  शेवटी एक विचार आणि योग्य एकता यातच ताकत आहे.  धन्यवाद.. 

त्यागाची कहाणी सुजल भाईगडे

त्यागाची कहाणी   आपल्या आजूबाजूला आपण अनेक गोष्टी ऐकत असतो ज्यांनी आपण भारावून जातो. कोणाचा संघर्ष, कोणाची जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा तर कोणाचा त्याग. ही गोष्ट अशाच आजी ची आहे जिने नातावसाठी सर्व घरदार, शेती, नातेवाईक सोडले आणि नातू साठी स्वतःला वाहून घेतले आहे.  गोष्ट आहे सौ. रेखा भगवान साळुंखे यांची. यांना 2 मुली. दोन्हींचे लग्न लाऊन दिले आणि गावाकडे आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत आपलं जीवन व्यतीत करत होत्या. पण नयतीला हे पहावले नाही, मुलीला अर्चनाला पहिला मुलगा झाला आणि तो अपंग आहे अस अस समजलं. घरची परस्थिती बेताची होती. उपचारासाठी मोठा खर्च लागणार होता. त्यामुळे मुलगी आणि जावई दोघांनी नोकरी करणे भाग होते. अशात दिव्यांग मुलाकडे कोण बघणार? तेव्हा आपल्या मुलीच्या लेकरासाठी आणि आपल्या नातवासाठी रेखाआजी सर्व घरदार शेतीभाती सोडून, नातेवाईक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या नवऱ्यासह मुलीचा घरी राहून सुजलला सांभाळले. त्याची सर्व सेवा, उपचार बघितले. अगदी शाळेत आणणे ते सर्व औषध उपचार फक्त त्याच करत असतात.  आपल्या नातावासाठी पराकोटीचा त्याग करणाऱ्या रेखा आजी ना सहयोगन...

विराट माने

गोष्ट विराटच्या आजीची.  एक आई आपल्या मुलावर तर जीव लावतेच पण त्यापेक्षा जास्त जीव आपल्या नातवाला लावते. एकवेळ आई मुलाला मारते पण आजी ही त्याची कवच कुंडल असते. ही गोष्ट आहे अस्मानी संकटाना परतवून लावणाऱ्या आजीची सुमन वसंत माने यांची. विराटची आजीच जिद्द ही विराट आहे हे आपल्याला इथे समजते.  घरची बेताची परस्थिती. मुलगा ड्रायव्हर, नातू गतिमंद झाला म्हणून सून त्याकडे लक्ष न देणारी. आजी कशीबशी परस्थिती सांभाळत होती आणि 2021 कोविडच्या महामारी नंतर घरावर अजून अस्मानी संकट कोसळले. विराट चे आजोबांचे निधन झाले आणि सहा महिन्यात विराटच्या वडिलांचा अपघात झाला, त्यात दोन्ही पाय मोडले, दोन्ही पायात रॉड टाकावे लागले. यातून कसेबसे सावरत होते तोच विराटची आई घर सोडून गेली. सुमन आजी वर असे एकामागोमाग एक संकट कोसळत होते. तरी खंबीरपणे उभे राहून विराट ला सांभाळत आहेत. 2 वर्ष पूर्वी त्यांना सहयोगनी बद्दल समजले आणि त्या विराट ल इथे अणु लागल्या.  70च्या वयात घर सांभाळत गतिमंद नातूचा सांभाळ त्या करत आहेत. त्यांच्या एका डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे. दुसऱ्या डोळ्याने कमी दिसू लागले आहे. अशात ही त्यांचं ल...