विराट माने
गोष्ट विराटच्या आजीची.
एक आई आपल्या मुलावर तर जीव लावतेच पण त्यापेक्षा जास्त जीव आपल्या नातवाला लावते. एकवेळ आई मुलाला मारते पण आजी ही त्याची कवच कुंडल असते. ही गोष्ट आहे अस्मानी संकटाना परतवून लावणाऱ्या आजीची सुमन वसंत माने यांची. विराटची आजीच जिद्द ही विराट आहे हे आपल्याला इथे समजते.
घरची बेताची परस्थिती. मुलगा ड्रायव्हर, नातू गतिमंद झाला म्हणून सून त्याकडे लक्ष न देणारी. आजी कशीबशी परस्थिती सांभाळत होती आणि 2021 कोविडच्या महामारी नंतर घरावर अजून अस्मानी संकट कोसळले. विराट चे आजोबांचे निधन झाले आणि सहा महिन्यात विराटच्या वडिलांचा अपघात झाला, त्यात दोन्ही पाय मोडले, दोन्ही पायात रॉड टाकावे लागले. यातून कसेबसे सावरत होते तोच विराटची आई घर सोडून गेली. सुमन आजी वर असे एकामागोमाग एक संकट कोसळत होते. तरी खंबीरपणे उभे राहून विराट ला सांभाळत आहेत. 2 वर्ष पूर्वी त्यांना सहयोगनी बद्दल समजले आणि त्या विराट ल इथे अणु लागल्या.
70च्या वयात घर सांभाळत गतिमंद नातूचा सांभाळ त्या करत आहेत. त्यांच्या एका डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे. दुसऱ्या डोळ्याने कमी दिसू लागले आहे. अशात ही त्यांचं लक्ष आहे ते विराटला कस मोठ करता येईल अशा परिस्थितीत पण त्यांना आधार वाटतो तो सहयोगीनीचा.
अशा विराट जिद्द असलेल्या विराट आजीला सहयोगी नी संस्थेचा सलाम.
Comments
Post a Comment