*तरस/लकडबंगा/ Hyana* जंगलाचा राजा सिंह मग वजीर वाघ, मग बाकीचे महाबली चिता, बिबट्या, जागवार(jagwar) हत्ती, गेंडा, रान-म्हशी असे काहीसे आपल्याला माहीत असते किंवा सर्वसाधारण सांगितले जाते. या सर्वांना पुरून उरतो आणि त्यांच्या हद्दीत राहून स्वतःचे अस्तित्व टिकवतो तो प्राणी म्हणजे तरस, हिंदीत त्याला लकडबंगा म्हणतात आणि इंग्लिश मध्ये Hyana. सिंह,वाघ, चिता, बिबट्या यांच्या कडे धारदार पंजे असतात, मोठे सुळे असतात, वेग असतो, चपळता असते, शरीर लवचिक असते, चिता सोडून बाकी झाडावर चढू शकतात. या सर्व प्राण्याकडे शिकार करण्यासाठी वरील नैसर्गिक गुण असतात. तरस या प्राण्याकडे वाघासारखे पंजे आणि नख्या नसतात, वेग नसतो, शरीर लवचिक नसते, झाडावर चढू शकत नाही. त्याच्याकडे असते मजबूत जबडा, मगरी सारखीच घट्ट पकड आणि सर्वात महत्वाचे समूहाची एकी. सिंहाला सर्वात जास्त टक्कर कोण देत असतील तर हे तरस. बरं याना शिकार करता येते आणि दुसऱ्याची ओढून पण घेता येते. संधी कशी साधायची हे याला पक्के माहीत असते, कधी कधी एकटा तरस फिरत असेल आणि याला चिता शिकार करता...