*हेरिटेज ट्राम* - *गोळे कन्स्ट्रकॅशन कंपनी*
*हेरिटेज ट्राम* - *गोळे कन्स्ट्रकॅशन कंपनी*
मुंबई, मुंबा देवी च्या नावतून आणि 7 बेटांचे बनलेलं हे शहर काळानुसार बदलत गेले आणि देशाची आर्थिक राजधानी कधी झाले हे कळलेच नाही. मुंबईच्या या अथांग प्रवासात अनेक गोष्टी चा सहभाग आहे. 18 व्या शतकात इंग्रजांची सत्ता असताना हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले. काळाची गरज ओळखून 1874 साली इंग्रजांनी जलद दळणवळण करण्यासाठी मुंबईत ट्राम सुरू केली होती. 1874 ते 1964 पर्यंत 90 वर्ष ही ट्राम मुंबईची सेवा करत होती. हळू हळू लोकल ट्रेन ने तिची जागा घेतली. मुंबईच्या विकासात मैलाचा दगड ठरलेली ट्राम ची हेरिटेज आठवण म्हणून मुंबई महापालिकेने, *छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस* (CSTM) जवळील *भाटिया उद्यनात* *ट्राम ची प्रतिकृती उभारण्याचा प्रोजेक्ट तयार केला.* अनके कंपन्यानी हा प्रोजेक्ट करण्यास असमर्थता धाकवली. महापालिका हे काम बिडींग पद्धतीने देते आणि अनेकांनी यात भाग घेतला नाही, शेवटी हे आव्हान घेतले ते *गोळे कन्स्ट्रकॅशन कंपनीने* एकटे सिंगल बीडर म्हणून हे काम या कंपनीला मिळाले, यात काम चुकले तर भुर्दंड भरायचा धोका असतो, पण न कचरता हा प्रोजेक्ट *गोळे कन्स्ट्रकशन कंपनी* ने घेतला.
आपल्या गावचे यशस्वी उद्योजक *श्री आनंदराव नारायण गोळे (दादा)* यांनी 1998 मध्ये छोटस लावलेलं हे रोपटं आज मुंबईतील एक यशस्वी कन्स्ट्रकशन कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. आपल्या उत्कृष्ट कार्यपद्धतीने महापालिकेचा विश्वास संपादन केला आहे. मुंबई महापालिकेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत, अतिशय सुंदर आणि ट्राम ला पुन्हा पूर्णजीवीत करणारा हा प्रोजेक्ट, दादा आणि त्यांचे दोन चिरंजीव, दीपक आणि अक्षय यांनी यशस्वी पणे पूर्ण करून महापालिकेला सुपूर्द केला आहे.
*आपल्या गावाच्या शिरपेचात आणि गोळे आडनावात हा आणखी एक कर्तृत्वाचा तुरा रोवल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन* 💐💐💐
Comments
Post a Comment