संघटनेतील शिस्त आणि एकी
*टीम वर्क* छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत तर आहेतच, त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी, सर्वसमावेशक वृत्ती, न्यायव्यवस्था सर्वश्रुत आहेच. त्यासोबत ते आधुनिक विचारसरणीचे प्रणेते होते. तसेच मॅनेजमेंट गुरु म्हणून देखील त्यांच्याकडून आजच्या युगात अनेक मॅनेजमेंट संस्था त्यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यांना शिकवतात. मागील आठवड्यात आमची कंपनीची वार्षिक मीटिंग लोणावळ्यात पार पडली. संपूर्ण भारतातून 500हून अधिक इंजिनियर, CA, HR, सर्विस ऑपरेशन टीम, सोबत मॅनेजमेंट चे अधिकारी होते. आणि मीटिंगची सुरवात झाली ती हर हर महादेव, जय शिवाजी जय भवानी या घोषणेने आणि समोर मोठ्या स्क्रीन वर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. उर असा अभिमानाने भरून आला की शब्दात सांगू शकत नाही. 3 दिवसाची मीटिंग संपवून घरी आलो आणि काल निवांतक्षणी वडिलांबरोबर विषय निघाला महाराज कसे उत्कृष्ट नियोजनाकर्ते होते. यावरून बोलत बोलत विषय वळला अफजलखान वधाच्या नियोजनाकडे. भेटीच्या अगोदर महाराजांनी प्रत्येकाला त्याची त्य...