संघटनेतील शिस्त आणि एकी

                      *टीम वर्क*
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत तर आहेतच, त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी, सर्वसमावेशक वृत्ती, न्यायव्यवस्था सर्वश्रुत आहेच. त्यासोबत ते आधुनिक विचारसरणीचे प्रणेते होते. तसेच मॅनेजमेंट गुरु म्हणून देखील त्यांच्याकडून आजच्या युगात अनेक मॅनेजमेंट संस्था त्यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यांना शिकवतात. 
मागील आठवड्यात आमची कंपनीची वार्षिक मीटिंग लोणावळ्यात पार पडली. संपूर्ण भारतातून  500हून अधिक इंजिनियर, CA, HR, सर्विस ऑपरेशन टीम, सोबत मॅनेजमेंट चे अधिकारी होते.
आणि मीटिंगची सुरवात झाली ती हर हर महादेव, जय शिवाजी जय भवानी या घोषणेने आणि  समोर मोठ्या स्क्रीन वर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. उर असा अभिमानाने भरून आला की शब्दात सांगू शकत नाही. 
3 दिवसाची मीटिंग संपवून घरी आलो आणि काल निवांतक्षणी वडिलांबरोबर विषय निघाला महाराज कसे उत्कृष्ट नियोजनाकर्ते होते. यावरून बोलत बोलत विषय वळला अफजलखान वधाच्या नियोजनाकडे. 
भेटीच्या अगोदर महाराजांनी प्रत्येकाला त्याची त्याची जबाबदारी नेमून दिली होती आणि काही झाली तरी त्यात चूक करायची नाही, अगदी त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तरी जे नियोजन केले आहे ते पार पाडायचे हे बजावून सांगितले होते. 
 तरी सुद्धा शेवटच्याक्षणी उडालेल्या धांदलीत संभाजी कावजीने जखमी खानाचा पाठलाग केला आणि तेच शिर कापून आणले. परंतु त्या वेळेत खानाचा वकिलाने राज्यांवर वार करायचा प्रयत्न केला. राज्यांनी त्वरित तो परतावला आणि त्याला ठार केले. नंतर राज्यांनी संभाजी कावजीना नियोजन न पाळल्याबद्दल खडसावले ani योग्य ते शासन केले. 
यातून आपण शिकतो परिस्थिती कशीही असो, आपला नेता, म्होरक्या, अध्यक्ष जे सांगेल ते करणे आपले काम आहे. संघटनेचे कार्य असल्यावर व्ययक्तिक काम, हेवेदावे, स्वतःचे विचार बाजूला ठेऊन संघटनेसाठी जे योग्य असेल ते करणे गरजचे असते. कोणीही एकटा संघटनांपेक्षा मोठा नसतो. टीम वर्क हे खूप महत्वाचे असते आणि ते शिकवण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात लाखो रुपये खर्चून ट्रेनर बोलावले जातात. पण आपल्याला हे महाराजांकडून अगोदरच शिकायला भेटले आहे आणि ते मंडळाच्या माध्यमातून प्रत्याक्षात उतरवायला भेटत आहे. 
तर आपण सर्व महाराजांना मानतोच आणि त्यांचे गुण आत्मसात करणे हे आपले परम कर्तव्य आहे. म्हणून उद्या आपण सर्व भेटणारच आहोत. या वर्षीच्या गणेश उत्सवाचे नियोजन करण्यासाठी. 
जय शिवराय
गणपती बाप्पा मोरया 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)