Posts

Showing posts from March, 2023

आरुद्र इलेव्हन 2023 संघ

                   *आरुद्र इलेव्हन*  *2023 संघ*   *आराध्य* आणि *रुद्र* यांच्या नावातून  नाव तयार झालेला *आरुद्र इलेव्हन* हा संघ. खरतर संघाचा *मेंटर आहे तो विजय जगताप*. मला फक्त क्रिकेट खेळायचे होते. त्याने मला संघमालक बनवले. संघ तयार झाला होता पण कोणाला कोणाचा खेळ माहीत नव्हता. विजयला सर्व खेळाडू चा खेळ माहीत आहे. कोणाला कधी आणि कसं प्रोसाहित करायचं हे त्याला सुरेख जमत.  गेल्यावर्षीचा आणि यावर्षीचा सुद्धा स्टार बॅट्समन *शुभम धोंडे (बाबू)* आमचा कर्णधार होता आणि राहील. अचूक टायमिंग साधून कमी ताकत लावून चौकर मारणे ही त्याची कला आणि तितकीच अचूक खोल गोलंदाजी टाकून समोरचा संघ जखडून ठेवणे त्याला जबरदस्त जमते. फायनल ला 2 ओव्हर मध्ये याने बलाढ्य ऋषी इलेव्हन संघ गारद करून टाकला.       प्रत्येक संघात एक आक्रमक खेळाडू लागतो जो समोरच्या संघात दहशत निर्माण करतो. त्याच्या बालिंग टाकायला येण्याने बॅट्समन आणि बॅटिंग ला आला की  बॉलर सुद्धा अवसान टाकतो तो आमचा विराट  म्हणजे *सोमेश उबाळे*. जबरदस्त आक्रमकता भ...

मी पाहिलेला पहिला सिनेमा

                     मी पाहिलेला पहिला सिनेमा 1980 ते 2000 चा काळ जो तंत्रज्ञान परिवर्तनाचा काळ होता तेव्हा गावाकडं  tv वैगरे प्रकार नव्हते, फक्त रेडिओ आणि टेप रेकॉर्डर वर ऐकून मनोरंजन व्हायचं.  सिनेमा बघायला जायचं म्हणजे एक उत्सव असायचा. सिनेमागृह ठराविक शहरात असायची. दळणवळनाची साधन खूप कमी अगदी नासल्यागतच. तेव्हा वडाप ला 407 टेम्पो चालायचे. मागे फाळका खाली पडलेला असायचा. वरती छताला एक जाड कासरा बांधलेला असायचा. त्याला पकडून कसरत करत टेम्पोत चढायचे. आम्हाला तर सरळ उचलून आत फेकले जायचे. बाई माणसाना चढायला उतरायला अवघड जायचं. असो.. विषयाकडे वळू.   तर तेव्हा सिनेमा बघायला जायचं म्हणजे तो सिनेमा प्रसिद्ध झाला असेल तर गावातील माणसं एखादा टेम्पो ठरवून बायका पोर घेऊन शहरात जात आणि सिनेमा बघून परत गावात आणून सोडत असत.  मला आठवत तेव्हा माहेरची साडी हा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता. गावा गावात त्याची चर्चा सुरू होती. बायकांमध्ये विशेष आकर्षण होत. जी बघून आली होती ती परत जायला उत्सुक असायची. तेव्हा हे टेम्पो वाले रोज ...

*दंडाच लुगडं आणि तडजोड*

                     *दंडाच लुगडं आणि तडजोड* आनंद पवार यांच चिलबल ही ललित कादंबरी वाचून आपलं लहानपण पण आठवत. काही आठवणी अशा असतात की ज्याना समांतर संदर्भ भेटला किंवा तसच काही वाचनात आल तर परत आठवतात नाहीतर मेंदूत कुठेतरी खोल दडून राहतात.  त्यांचीबदंडाच लुगडं ही गोष्ट वाचली आणि आठवलं की आपल्या लहानपणी पण आईने आपल्यासाठी अशीच मोठी तडजोड केली होती. तेव्हा त्या लहान बुद्धीला फक्त त्याला काय हवं ते दिसत होतं आज ते आठवलं की आपल्या आई वडिलांचा त्याग दिसतो.  तर गोष्ट आहे सण1990- 91 ची.  तेव्हा आम्ही गावी राहत होतो. एकत्र कुटुंबात होतो, वडील मुंबई ला कामाला होते, आपले हट्ट आई किंवा आजी कडे पुरवून घायचे.  तर आज ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आहे तिथे गावची तालीम होती. बंदिस्त खोली मध्ये, पारंपरिक प्रकारची तालीम गावकऱ्यांनी तयार केली होती. दरवाजातून आत जाताच, 5 फूट रुंद कट्टा व्यायाम करायला आणि मग 15 बाय 15 चा मोठा, 3 फूट खोल चौकोनी खड्डा. ज्यात बारीक लाल माती टाकली होती.  तालीम गावात तयार झाली होती आणि लहान मोठी पोर...

पर्याय (Options)

                        *पर्याय (options)* लहान मूल रडत असते, त्याला काय हवं ते आपल्याला कळत नाही, भूक लागली आहे का? सु-शी केलं आहे का हे आपण तपासतो, तरी ते रडत असत. मग आपण त्याला वेगवेगळी खेळणी देतो, वेगवेगळे आवाज काढून ऐकवतो, विचित्र हालचाली करून धाकवतो, हे सर्व जे आपण करतो ते आपण त्याला न रडायला पर्याय देतो.  जेव्हा आपण निर्णय घ्यायला बीचकतो, काय करायचे सुचत नाही, तेव्हा शेवटी आपण 2-3 शक्यता ठरवतो ते असतात पर्याय आणि त्यातुन आपण एक निवडतो. आणि जो पर्याय काम करतो त्याला आपण उपाय म्हणतो. जो उपयोगी आला तो उपाय 😄. इतिहासातील धाकले बघितले तर लक्षात येते इतिहास हा पर्यायावर आधारित आहे. पांडवांनी कौरवांना युद्ध टाळायला पाच गावाचा पर्याय दिला, नाही दिली तर युद्धशिवाय पर्याय नाही हे सांगितले. कोणताही युद्ध खूप लांबल की दोन्ही पक्ष तहाचा पर्याय शोधतात. आणि कधी कधी लढणे हाच पर्याय उरतो.      मला शिवचरित्र आजच्या परिस्थितीत कसे उपयोगात येईल हे शोधायला आवडते. जेव्हा जुलमी परिस्थिती अगदी टोकाला गेली होती, अत्याचारातून...

मोहीम

                 *शेवटपर्यंत लढणारे मराठे* एखादी मोहीम ठरली की ती पूर्ण होईपर्यंत शेवट पर्यंत कार्यरत राहणे, लढणे, संकट मोडून काढणे हे मराठ्यांचे स्थायी भाव आहेत. जर आपण स्वतःला मावळे म्हणतो तर आजही हे गुण आपल्याला दाखवणे गरजेच आहे.  आजच्या काळात आशा मोहीम म्हणजे आपल्या गावात, परिसरात, समाजात, होणारे सार्वजनिक कार्य. एखाद काम हाती घेताना सुरवातीला सार्वजनिक मीटिंग, विचारविनिमय सभा घेतल्या जातात. अशा सभा मधून ते कार्य कसे पार पाडले जाणार, निधी कसा जमवायचा, कामच स्वरूप काय असेल, किती वेळात ते कार्य पूर्ण केले जाईल, काय अडथळे येऊ शकतात हे समजते. अशा सभा मध्ये काही शंका असतील तर विचारल्या पाहिजेत, जर विरोध असेल तर तो का? हे कारणांसहित सांगितले पाहिजे. समाज मला नाव ठेवेल, वेठीस धरेल, मी का बोलू? विरोध करणारा मी एकटाच तर नसेन ना? असा विचार जर शांत बसले तर होकार देणारे जास्त आहेत असं समजून कार्य प्रारंभ होते. मग इथे आपण या मोहिमेचा भाग असतो आणि सर्वांसोबत चालणे आपले कर्तव्य असते.  मग जेव्हा हे सार्वजनिक कार्य प्रगतीपथावर जाते, त्यासाठी निध...

महू कुंडी

 महूकुंडी गावाबद्दल लिहिलं तेवढं कमीच असत. कारण प्रत्येक दिवस हा एक आठवणींचा असतो. शेती डोंगर आणि नदी हे ज्या गावाला लाभले ते गाव स्वर्ग असते.असाच आमच्या गावच्या नदीवरील पाण्याचा डोह ज्याला महू कुंडी या नावाने ओळखले जाते. करहर पांचगणी ला जोडणाऱ्या रस्त्याचा पूल, त्याखाली खडकाळ पात्र ज्यावर गावातील महिला कपडे धुतात, उन्हाळ्यात इथे पूर्ण गावच्या वाकळा धुतल्या जातात आणि वर पुलावर सुकवल्या जातात. त्याखाली पाण्याचा डोह, दोन्ही बाजूनी खडकाने वेढलेल नदीच पात्र, एक छोटासा धबधबा, त्या बाजूला तयार झालेली खडकाची खंदक ज्याला भोवरी म्हटले जाते.त्या खडकावर गावची कुलदेवीच छोट मंदिर. दसरा आणि यात्रे ची पालखी तामजय वरून शिवे मार्गे सर्वप्रथम या देवीला भेटायला येते मगच गावात जाते. पुलावरून येताजाता गावकरी त्या देवीला नमस्कार करतात किंवा गाडी चालवणारे गाडीचा हॉर्न वाजवून मानवंदना देतात.  डोह पुढे जाऊन रुंद आणि खोलीला कमी होत जातो, त्याखाली स्मशानभूमी. त्याखालोखाल एक नैसर्गिक पाण्याचा झरा आहे ज्याला काळसरी म्हटले जाते.  अशा या महू कुंडीवर जुन्याकाळी देवीचं सण असला की जेवणाची भांडी देखील वर य...