पर्याय (Options)

                        *पर्याय (options)*
लहान मूल रडत असते, त्याला काय हवं ते आपल्याला कळत नाही, भूक लागली आहे का? सु-शी केलं आहे का हे आपण तपासतो, तरी ते रडत असत. मग आपण त्याला वेगवेगळी खेळणी देतो, वेगवेगळे आवाज काढून ऐकवतो, विचित्र हालचाली करून धाकवतो, हे सर्व जे आपण करतो ते आपण त्याला न रडायला पर्याय देतो. 
जेव्हा आपण निर्णय घ्यायला बीचकतो, काय करायचे सुचत नाही, तेव्हा शेवटी आपण 2-3 शक्यता ठरवतो ते असतात पर्याय आणि त्यातुन आपण एक निवडतो. आणि जो पर्याय काम करतो त्याला आपण उपाय म्हणतो. जो उपयोगी आला तो उपाय 😄.
इतिहासातील धाकले बघितले तर लक्षात येते इतिहास हा पर्यायावर आधारित आहे. पांडवांनी कौरवांना युद्ध टाळायला पाच गावाचा पर्याय दिला, नाही दिली तर युद्धशिवाय पर्याय नाही हे सांगितले.
कोणताही युद्ध खूप लांबल की दोन्ही पक्ष तहाचा पर्याय शोधतात. आणि कधी कधी लढणे हाच पर्याय उरतो.
     मला शिवचरित्र आजच्या परिस्थितीत कसे उपयोगात येईल हे शोधायला आवडते. जेव्हा जुलमी परिस्थिती अगदी टोकाला गेली होती, अत्याचारातून बाहेर कसे पडायचे हे समजत नव्हते तेव्हा त्यातून बाहेर पडायला, लढायला बळ द्यायला, स्वकीयामध्ये नवीन जोश, उर्मी भरायला महाराजांनी स्वराज हा सर्वोच पर्याय तयार त्यांना दिला. त्यातून जे घडले ते अद्भुत होते आणि आहे.
जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्यासमोर असेच वेगवेगळे पर्याय उभे असतात. शिक्षण कशात घायचे, दहावी नंतर काय, नोकरी कोणत्या क्षेत्रांत करायची, लग्न करायचे की नाही. मग प्रेमात पडून की ठरवुन.. 
असच राजकीय सामाजिक क्षेत्रात ही चालू असत. जर आपल्याला एखाद्या नेतृत्व, त्याच कार्य आवडत नसेल तर त्याला नुसतं नाही म्हणून चालत नाही, तो नको, हा नको अस म्हणून चालत नाही, त्याला पर्याय शोधावा लागतो तरच तो बदलला जाऊ शकतो. 
जीवन हे असेच पर्यायांनी भरलेलं आहे, आपलं काम आहे योग्य शोधणे नी उपयोगात आणणे. 
बघा माझा लेख वाचा नाहीतर स्क्रोल down करायचा पर्याय  आहेच आपल्याकडे 😊😊😊
धन्यवाद
आपलाच जयंत जगताप
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)