पेरणीच्या काळ
पेरणीच्या हंगाम ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देई ज्ञान, ज्ञानदेव प्रमाण.. निवृत्ती देई ज्ञान... निवृत्ती देई ज्ञान... आषाढी सप्ताह चा आज प्रारंभ झाला, यानिमित्त गावात अतिषय भावमय असे भजन झाले, खूप दिवस झाले खूप काही लिहायचे बाकी राहिलंय, आज वरील अभंग ऐकला आणि मन प्रसन्न झाले. 28 वर्ष नंतर पहिल्यांदा असे वातावरण अनुभवत आहे. कोरोना चा कहर चालूच आहे, पण आता तो विषय जुना झालाय, शेतकरी जोमाने कामाला लागला आहे, जुन च्या पहिल्या आठवड्यातच जोमदार पाऊस पडला, जमिनीला घात आला, बैलांचा आराम संपला, पाबार शेतात फिरू लागली, औती शेता-शेतात फिरू लागली, सारंग, सुंदर, नाजूक,हिरा,पोपट, राजा, सर्जा नावाचे आवाज शिवारात घुमू लागले, माती खालीवर होऊ लागली तसा तीचा सुगंध, दरवळू लागला, सोबत बैलांचा शेणाचा एक वेगळाच वास पाबरीमागे, कुळवणीमागे येत असतो तो कुठेच परत अनुभवायला मिळत नाही, जमिनीतील किडे वर येऊ लागले त्यांना खायला सीझन चालू झाला आणि वावरत कुंपण पडू लागलीत, बांध वरील पावसाळी रस्ते पुम्हा एकदा मळू लागले, चपला घरात राहू लागल्या आणि पाय चिखल तुडवू ल...