उफळता उत्साह
बदललेला गाव
आजकाल अनेक अशा घटना घडत आहेत की ज्या कधीच घडत नव्हत्या, ही किमया आहे कोरोना ची.
अशीच किमया आमच्या गावात घडली आणि तीन पिढ्यांचे तरुण, लहान, वयस्कर, जुने जाणते सर्व गाववाले कॉरोनात गावात आले, अडीच महिने एकत्र राहून अनेक पार्टी पार पडल्या, सुरवातीला ज्या कोंबड्या ना कोरोना मुळे नाकारले गेले त्या कोंबड्यांवर सर्व मांसाहारी तुटून पडले, सोबत मद्यपानी ने देखील आपली व्यवस्था करून घेतलीच होती. आशा प्रकारे गावात lockdown मध्ये अनेक जुन्या नवीन गोष्टी समजल्या, अनेकानी पहिल्यांदा शेतीची अनेक कामे केली, (मी पण त्यातलाच एक), ताली धरल्या, कोणी दगडी उचलल्या, वावरे नीट केलीत, अनेकांनी झाडे पाडलीत, जळण जमवलं, काहींनी बांध फोडले आणि आपली वावरे कशी वाढतील यासाठी निरर्थक प्रयत्न केले. काहींनी चिमण्यांची घरटी बनवून आगळा वेगळा उपक्रम राबवला. भागात शेवटी का होईना पण ग्रामपंचायतीने रक्तदान शिबिर घेतले आणि 78 बाटली रक्तदान केले.
यासोबत गावात अनेक वाद झाले, काही घरगुती, तर काही सामाजिक आणि राजकीय असे होते आणि अजूनही चालू आहेत. असो...
पाहिला 1 महिना संपला आणि लोकांचा संयम संपू लागला, कामे संपू लागलीत आणि मुलांचे ग्रुप एकत्र जमू लागले, वयक्तिक अंतर ठेवून आता मुले बसत होती पण आता कंटाळा येत होता, त्यात करहर वरून पोलिस राऊंड साठी येत आणि लाठीचार्ज करत असत, त्यात शिंदे हवालदार चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.
अद्वितीय अशा वातावरणात, श्रीगणेश मित्र मंडळाने एक जबरदस्त असा उपक्रम राबवला. मंडळाचे अध्यक्ष श्री भरत श्रीपती गोळे यांच्या एक शब्दवर आणि एक हाकेवर दिनांक 1 जून ला 60 ते 70 कार्यकर्ते जमले आणि गावची जुनी पाण्याची पाईपलाईन काढायला सुरवात केली, सकाळी 8 ला सुरवात केली ते दुपारी 3 वाजता थांबले आणि एक दिवसात 70% काम पूर्ण केलं. 250 ते 300 पाईप काढले आणि डोंगराच्या खाली आणून ठेवले, एकदम खडा असा डोंगर या कार्यकर्त्यांच्या उत्सह पुढे फिका वाटत होता.
जे काम 7 ते 8 दिवसात झाले असते ते काम या तरुण आणि जिद्दी मुलांनी 2 दिवसात पूर्ण केलं.
काही गोष्टी नियोजनाने होतात पण काही फक्त तुमच्या एकी, आत्मविश्वास आणि एकमेकांना सावरून घेण्याचं गुणांनी अतिशय यशस्वी होतात हे या श्रीगणेश मित्र मंडळाच्या सहकाऱ्यांनी सिद्ध करून धाकवले आहे.
आपण केलेले सामाजिक कार्य आणि गावची सेवा आणि दिलेलं *योगदान* यासाठी सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद
एक महुकर जयंत जगताप
श्री काळभैरवनाथ प्रसन्न
भैरवनाथाच्या नावांन चांगभलं!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
गणपती बाप्पा मोरया!!
आशा जोशपूर्ण घोषणा सह्याद्रीच्या डोंगररांगेत घुमत होत्या. भर उन्हात कडेकपाऱ्या आवाजाच्या प्रतिध्वनींनी तगरथरत होत्या. पांचगणी- राजपुरी च्या थोडं खाली आणि बिरामने वाडीच्या आई तामजाई मातेच्या वर कड्यांमद्ये श्री गणेश मित्र मंडळ महू चे सभासद कार्यकर्ते डोंगरातील झऱ्यांच्या आसपास काम करत होते!
डोंगर म्हणजे असंख्य साधनसमुग्रीचे भांडार! भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके ठिकठिकाणी पाहायला मिळतात. परंतु उंचच उंच डोंगराच्या कडेकपारित बिस्लरी कंपनी सारख्या मिनरल पाण्याला लाजवतील असे थंडगार पाण्याचे अविरत वाहणारे झरे म्हणजे देवाची देणच! अशीच देणं ग्रामपंचात महू ला लाभली आहे. खूप वर्षांपूर्वी आमच्या पूर्वज ग्रामस्थांनी पाण्याचे पाणी डोंगरातून खाली गावात लोखंडी पाईप द्वारे एका रात्रीत आणले. दोन तीन वर्षांपूर्वी ग्रामपरी पांचगणी आणि ग्रामस्थ मंडळ महू यांच्या सहयोगाने झऱ्यांच्या दुरुस्ती करून आणि मोठी पाईप टाकून परत पाणी गावात आणण्यात आले.
लॉकडाऊन काळात कामानिमित्त मुंबई पुण्याला असणारे चाकरमाणे गावी आले होते. गावातील कामे, कार्यक्रम गावातील नागरिक पार पाडतात. मुंबई, पुण्याला असणारे नोकरदार वर्गाचा सहभाग अतिशय कमी असतो. लॉक डाऊन काळात गावासाठी काहीतरी करण्याची संधी हवी होती. जून ते सोनंच असत. पूर्वजांनी एका रात्रीत टाकलेली पाईपलाईन डोंगरात तशीच पडून होती. ती जर तशीच पडली खराब होईल. गावचे मा. सरपंच विठ्ठल दगडू गोळे(आण्णा) यांच्या मार्गदर्शनातून पूर्वजांनी टाकलेल्या पाईप परत काडून गावात आणण्याचं ठरलं. ज्या संधीची वाट आम्ही पाहत होतो ती संधी मिळाली होती. पाईपलाईन काडून आणण्यासाठी श्री गणेश मित्र मंडळ महू चे तरुण तयार झाले. आणि लाखमोलाची सोबत भेटली ती मा. सरपंच अण्णांची.
सकाळी आम्ही सर्वजण अण्णांच्या सोबतीने निघालो. श्री विनोद बाळू गोळे चे यात खूप मोठं योगदान लाभलं. त्याने सर्व पाईप खोलून आणि आम्ही ते खाली आणले. गरम खूप होत होत थकवा जाणवत होता परंतु श्री काळभैरवनाथ आणि आई तामजाई माता चे आशीर्वाद पाठीशी होते. छत्रपती शिवराय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हृदयात होते. त्यामुळे हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्द अंगात होती.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशिअल डिस्टनसिंग पाळून मास्क बांधून आम्ही काम करत होतो. करवंदे, जांभळे, तोरणे असा रानमेवा. ढगांमुले उनसावलीचा खेळ. कधीतरी हळुवार वाऱ्याची झुळूक. किंचितसा पाऊस, दहिवर. इंद्रधनुष्य आणि जावळी खोऱ्याचा दिसणारा अद्भुत नजऱ्यात आम्ही पाईप काढून आणण्याचे काम दोन दिवसात संपवले.
डोंगरात काम करत असताना सहभोजन करण्यात आले. सहभोजनाचे नियोजन श्री गणेश मित्र मंडळ चे अध्यक्ष श्री भरत श्रीपती गोळे, अविनाश रघुनाथ गोळे, साजन ग्रुप, प्रीतिष रांजणे, शरद बबन गोळे आणि मंडळाचे खजिनदार संदिप दत्तात्रय गोळे यांनी केले.
या कामासाठी मा. विठ्ठल आण्णा आणि श्री गणेश मित्र मंडळ महू च्या सर्व सभासदांचे कौतुक करावे तितकेच कमी.
सर्वांना धन्यवाद!!!!!
Comments
Post a Comment