युध्द कोरोना विरुद्ध भाग 3 डॉक्टर पोलिस आणि प्रशासन युद्ध चालू झाले आहे सामान्य जनता आपापल्या घरांकडे, गावाकडे, घरट्याकडे पळत आहे, शत्रू ने पहिली फळी गारद केली आहे, शत्रू आत घुसला आहे, अजूनही दुसरी फळी लढत आहे पण दुसरी अन तिसरी फळी मध्ये अनागोंदी माजली आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्या फळीत एक संरक्षण भिंत उभे करायची आहे. शत्रू कुठून कसा कधी हल्ला करेल हे माहीत नाही, शत्रू वार करतो आणि वार झालेला न कळत शत्रूचे काम करत असतो. वार पण असा आहे की वार झाल्यावर 1 ते 2 आठवडे त्याला कळतं नाही की आपण शत्रूचे वाहक झालोय. आपली धावपळ , अनागोंदी, मूर्खपणा, निष्काळजीपणा हेच शत्रूचे मोठे सेनापती आहेत. या सेनापतींशी टक्कर घेत आहेत ते आपले पोलीस आणि प्रशासन, सामान्य जनता न कळत या शत्रूचे बॉम्बगोळे बनत आहेत, ते निकमी करणे आणि जी वात पेटत आहे ती विझवायचे मोठे काम आपले डॉक्टर्स करत आहेत. हे बॉम्ब कधीही फुटू शकतात , कदाचित डॉक्टर ही असेच नकळत, इच्छा नसतानाही, सर्व काळजी घेऊनही, शत्रूचे वाहक बनू शकतात, पण ते देवदूतासारखे त्यांचे काम करत आहेत. प...