आराध्य डायरी 2020

1 वर्ष घाटकोपर मध्ये राहिलो व आरुच्या पुढील शिक्षणासाठी शाळेची गरज  आहे हे ओळखून वाशी मध्ये राहायला आलो. 
वाशी मध्ये sunshine school मध्ये प्रवेश घेतला. 
आराध्य ची शाळा चालू झाली आहे. 
शाळे मुळे आई वाडीलांपासून थोडा वेळ दूर राहण्याची सवय त्याला करायची आहे. 
सध्या तो त्याच्या आईकडे खूप जास्त चिकटलेला असतो. 
घरात त्याला सतत आई हवी असते. 1मिनिट जरी ती दिसली नाही तरी तो सैरभर होतो, तिला शोधतो, तिच्यासाठी रडतो, गोंधळ करतो, बाहेर जातो शोधायला, आईला तो बाथरूम मध्ये ही जाऊन देत नाही. झोपताना तिच्या कुशीत अगदी अगदी चिकटून झोपतो.  हे प्रेम आहे पण जास्त सवय झाली तर त्याचा दोघांना त्रास होणार आहे, आईला तर खूप तडजोड करावी लागत आहे. 
तो उठायच्या अगोदर तिला सकाळच्या विधी, अंघोळ, इतर कामे आटोपून घ्यावे लागते. हा उठला की हा तिचे शेपूट बनून मागे मागे फिरत असतो. मी घरी असलो की मी याला थोडा सांभाळतो पण याचे लक्ष त्याच्या आईवरच असते. मानिषला बाहेर जायचे असेल तर मला अगोदर याला बाहेर घेऊन जावे लागते, नाहीतर हा घरात गोंधळ घालतो, स्वतःचे डोके अपटतो, रडतो, नाहीतर tv वर कार्टून गाणी लावून द्यावी लागतात. 
सध्या गांण्याचे एक खूप वेड लागले आहे. जेवताना गाणी पाहजेतच त्याला. तरच जेवणार नाहितर खात नाही किंवा उलटी काढतो. 
Tv चा रिमोट कोणता ते त्याला चांगले माहीत आहे. तसच बाईक वर फिरायला खूप आवडते त्याला, आपली गाडी तो बरोबर ओळखतो. 10-15 बाईक मधून आपली बाईक शोधून काढतो. 

तसे 2020 वर्ष थोडे कठीण चालू झाले होते. मला हाताला लागले होते,  13 जानेवारीला आरुच्या डोळ्याला लागले होते, नाकातून रक्त आले होते. 
मग त्याला ताप आला तो 4-5 दिवस येत होता. रक्त तपासले तर त्यात  लोह, ड-जीवनसत्व कमी आहे असं समजलं. 
आता त्यावर औषध सुरू केली आहेत. 

मानिषाने दरवर्षीप्रमाणे माझा वाढदिवस खूप आनंदात आणि जल्लोषात साजरा केला खूप छान केक तिने बनवला होता. मंडळाची पोर घरी आली होतीत केक घेऊन. मग 2 दिवसांनी त्यांना मटण पार्टी दिली, मानिषाने एकटीने 12 जणांचे मांसाहारी आणि शाकाहारी जेवण बनवले होते. 
असा हे वर्ष 2020 चालू आहे. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)