Posts

Showing posts from February, 2023

jackel/लांडगा /कोल्हा/ लोमडी

      *Jackal/कोल्हा/ लोमडी/ सियार* एकदा जंगलात एक हत्तीची शिकार करून सिंह आणि सिंहनी खात होते.  बऱ्याच जणांचं पोट भरलं होत आणि ते बाजूला झाडाखाली सुस्तवाले होते, 1- 2 तरुण सिंह आपलं timepass म्हणून मोठी हाडे चाटत बसले होते. एखाद्या सिंह मधेच शिकरिकडे जाऊन येत होता. बारकाईने बघितले तेव्हा समजले तिथे एक कोल्हा त्या हत्तीच्या शिकारीचे काही तुकडे तोडून पटापट गिळत होता. सिंह जवळ आला की हा लांब पळायचा आणि परत संधी साधून मांस मिळवायचा.  जर त्याने आयुष्यात कधी स्वतः हत्ती मारून खायचा विचार केला असता तर तो विचारच राहीला असता किंवा त्याचे साथीदार त्याला वेड्यात काढतील. पण संधीच सोन कस करायचं ते या प्राण्याकडून शिकता येत. स्वतः ही ससे, जंगली उंदीर, पक्षी असे छोट्या प्राण्यांची शिकार हे करतात, कधी मोठी शिकार केली किंवा कुठून जास्त मांस भेटल तर ते जमिनीत पुरून ठेवून हे परत खातात.  चाणक्य जस म्हणतो, प्राण्यामध्ये कोल्हा (कुत्र्यानंतर,  कुत्रा खूप वरच्या लेवल ला येतो.) आणि पक्ष्यात कावळा हुशार असतो. सर्वभक्षी आणि संधी भेटली की ती कशी यशस्वी करायची याची यांना पक्की म...

सेनापती

                       *सेनापती* सरसेनापती, सेनापती, वजीर, commander in chief, किंवा General. कोणत्याही भाषेत हा शब्द भारदस्त आहे. हे पद इतकं मोठं आहे की ते ऐकून देखील मन रोमांचित होते. मला सर्वात जास्त कुहुतल, सन्मान वाटतो ते याच पदाचा. जर मला संधी मिळाली की राजा बनणार की सेनापती, तर मी सेनापती निवडेन. जर राज्य हे मंदिर मानले तर राजा त्या मंदिराचा कळस असतो तर सेनापती हा त्या मंदिराचा मुख्य खांब असतो. त्याच्यावर सर्व डोलारा उभा असतो. तो जितका कसदार, मजबूत, हुशार असतो तितके ते राज्य सामर्थ्यशाली असते.    ययातीचा सेनापती कच, पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न  (Dhristadyumna) जो शेवट पर्यंत सेनापती राहिला. सम्राट अशोकाचा सेनापती बिंबिसरा, मगध राज्याचा सेनापती चंद्रगुप्त मौर्य, शिवाजीमहाराजांचे सेनापती, नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, galdiator सिनेमातील रोमन साम्राज्याचा सेनापती मॅक्सिमस, फ्रेंच सेनापती नेपोलियन बोनापार्ट आणि मराठी साम्राज्य अटकेपार नेणारे महान सेनापती पेशवा बाजीराव, अशा अनेक महान स...

स्वछ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की और, माझा प्रभाग, माझा अभिमान या मोहिमेअंतर्गत कोपेरखैरने सेक्टर 1 ते 4 चे समाजसेवक, जनमानसात मिसळून राहणारे श्री. नारायण शिंदे व नगरसेविका सौ. सायलीताई नारायण शिंदे यांनी आज आपला प्रभाग आपण स्वतः स्वच्छ करायचा व स्वछता कामगाराना थोडे सहकार्य करायचे हा उपक्रम आयोजित केला होता.   नवी मुंबई महापालिका शाळा विद्यार्थी  व काही कॉलेज चे विद्यार्थी व प्रभागातील नागरिक यांनी मिळून स्वच्छता प्रतिज्ञा घेतली.  स्वछता अभियानात सहभागी होऊन वेगळाच अभिमान आणि आनंद झाला. 

चिलबल चा प्रवास

--///////////// *चिलबल चा तकटा*///////////---- फेसबुक वरील ओळखीने एक दमदार लेखक माहीत झाला आणि त्यांचं गावाकडील अनुभवांचं, प्रवासाच, बालपणीच्या आठवणींचे ललित लेखन असलेलं त्यांचं पुस्तक ऑनलाइन मागवल. दिवाळीत नवीन काहीतरी वाचायला मिळेल अस ठरवून सुरवात केली.  हळूहळू वाचताना लक्षात आले की हे एकसाथ किंवा वेगात वाचून संपवावे अस लेखन नाही आहे. प्रत्येक गोष्ट वाचून त्या काळात जाऊन आपण डोळयांसमोर बघत आहे अशी आहे. त्यामुळे ठरवलं की प्रत्येक विमान प्रवासात एक-एक गोष्ट वाचून अनुभवायची. सुरवात ही झाली, 5 प्रवासात 6 गोष्टी पूर्ण केल्या. विमानात बसलो पुस्तक आपल्या पुढच्या सीटच्या मागील भागात पेपर-पुस्तके ठेवायला जागा असते तिथे ठेवायचे . मग विमान आकाशात झेपावायला आणि स्थिरस्थावर व्हायला 20मिनिटे घेते. त्या वेळात मी डोळे बंद करून निवांत होतो. मग एअर होस्टेस चा आवाज येतो "कुर्सी की पेटी बांधने का संकेत अब बंद हो चुका है, लेकिन अपनी सुरक्षा के लिये आप कुर्सी पेटी बांधे रख सकते है".  यानंतर मी पुस्तक काढून वाचन चालू करतो. पण यावेळी झोप लागली ते डायरेक्ट विमान भुवनेश्वरला उतरले तेव्हा जाग आली. घा...