jackel/लांडगा /कोल्हा/ लोमडी

      *Jackal/कोल्हा/ लोमडी/ सियार*
एकदा जंगलात एक हत्तीची शिकार करून सिंह आणि सिंहनी खात होते.  बऱ्याच जणांचं पोट भरलं होत आणि ते बाजूला झाडाखाली सुस्तवाले होते, 1- 2 तरुण सिंह आपलं timepass म्हणून मोठी हाडे चाटत बसले होते. एखाद्या सिंह मधेच शिकरिकडे जाऊन येत होता. बारकाईने बघितले तेव्हा समजले तिथे एक कोल्हा त्या हत्तीच्या शिकारीचे काही तुकडे तोडून पटापट गिळत होता. सिंह जवळ आला की हा लांब पळायचा आणि परत संधी साधून मांस मिळवायचा. 
जर त्याने आयुष्यात कधी स्वतः हत्ती मारून खायचा विचार केला असता तर तो विचारच राहीला असता किंवा त्याचे साथीदार त्याला वेड्यात काढतील. पण संधीच सोन कस करायचं ते या प्राण्याकडून शिकता येत. स्वतः ही ससे, जंगली उंदीर, पक्षी असे छोट्या प्राण्यांची शिकार हे करतात, कधी मोठी शिकार केली किंवा कुठून जास्त मांस भेटल तर ते जमिनीत पुरून ठेवून हे परत खातात. 
चाणक्य जस म्हणतो, प्राण्यामध्ये कोल्हा (कुत्र्यानंतर,  कुत्रा खूप वरच्या लेवल ला येतो.) आणि पक्ष्यात कावळा हुशार असतो. सर्वभक्षी आणि संधी भेटली की ती कशी यशस्वी करायची याची यांना पक्की माहिती असते. याच्या गुणांवर आधारित हॉलीवूड मध्ये एक सिनेमा बनला आहे जॅकेल (jackel).
कोल्हा लबाड म्हणून प्रसिद्ध आहे पण जे कुणाला ही गुंगारा देतात, चतुर असतात, चपळ असतात त्यांना सामान्य बुद्धी वाले लबाड बोलतात. 
असा हा कोल्हा संपूर्ण जगात सगळीकडे वसला आहे. हिमालयाच्या बर्फात, गवताळ प्रदशात, वाळवंट असो की गोठवणारा आर्टिक खंड असो. सिंह, वाघ आणि ध्रुवीय अस्वल शिकारीचा माग काढतात, यांचा माग काढतो तो हा कोल्हा.  हा कोल्हा स्वतःची उपजीविका चालवत असतो. नक्कीच हा जीवावर खेळत असतो पण याचा स्वतःच्या चपळाई वर विश्वास असतोआणि समोरचा च्या कामजोरीवर लक्ष असत.
शरीराने छोटा पण बुद्धी ने तल्लख असा हा प्राणी नेहमीच माणसासाठी अप्रुक वाटत आला आहे. कुत्रा याच्यापेक्षा हुशार पण याच हुषारीमुळे तो मांसाळला आणि पाळीव बनला आणि कोल्हा आजही स्वतंत्रपणे जंगलात स्वतःच्या हिमतीवर आणि कधी कधी दुसऱ्याच्या मेहनतीवर स्मार्ट वर्क करून यशस्वी होत आहे. आज त्याला सलाम.
धन्यवाद
जयंत जगताप
7738022343

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)