एक से भले दो
*एक से भले दो* लेखक जयंत जगताप 7738022343 चीन आणि भारत या देशात लोकसंखेचा भस्मासुर वाढला आणि लोकसंख्या नियंत्रण करायला चीन मध्ये सक्ती ने फक्त 1 अपत्य, तर भारतात हम दो हमारे दो चा नारा दिला गेला. सुरवातीला चीन नियंत्रणात अग्रेसर वाटला, आता भारत 1 नंबर ला जाईल असे वाटू लागले. पण हळू हळू 1 अपत्य ही संकल्पना घातक आहे ही चीन ला समजू लागले. अनेक जोडपी फक्त मुलगा असेल तर जन्म देऊ लागली नाहीतर अबोरशन करू लागली. अनेकांनी अपत्य नकोच अशी भूमिका घेतली. लहान मुलांचे तस्करी, चोऱ्या वाढू लागल्या, 1 टी मुले मानसिक आजाराची बळी पडत आहेत. या समस्ये वर मात करायला आता चीन सरकार प्रयत्न करत आहे. दुसरे अपत्य झाल्यास त्यास सरकारी अनुदान देत आहेत, नोकरीत संधी दिली जात आहे, शिक्षण आणि आरोग्य सेवा मध्ये सूट किंवा मोफत दिले जात आहे. आता आजकाल भारतात मध्यम वर्गात, शक्यतो जिथे दोघे ही नोकरी करत आहेत अशा कुटुंबात 1 मुलाचा/मुलीचा जो ट्रेंड चालू आहे. 1 अपत्य सांभाळायला सोपे, खर्च कमी, नोकरी करून त्याला बघता येते, विभक्त कुटुंब अस अनेक कारणे असतात आणि काही अंशी ती योग्य आहे...