*कोण बाळासाहेब*
*कोण बाळासाहेब*
बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब सावंत, बाळासाहेब केसरकर, बाळासाहेब गोगावले, बाळासाहेब सरनाईक, बाळासाहेब कदम, बाळासाहेब मोदी, बाळासाहेब शहा, बाळासाहेब फडणवीस,
नेमक नाव काय ?😂😂😂.
वरील प्रतिक्रिया ऐका ठाकरे गटाच्या समर्थकाने *बाळासाहेबांची शिवसेना* या नावावर दिली आहे. या भावनिक सैनिकांच समजू शकतो पण आज चक्क मुंबईच्या महापौर म्हणाल्या नक्की कोण बाळासाहेब आणि वरच्या सारखेच इतर आडनाव घेतलीत.
काहींनी तर काही webseries आणि चित्रपटातील पात्र ही बाळासाहेब म्हणून फोटो म्हणून टाकलेत. तेव्हा यांची कीव येते. आपलं आराध्य दैवत मानतात आणि कोण बाळासाहेब अस विचारतात??..
*क्रिकेट मध्ये सचिन म्हटलं की कोण सचिन, सिनेमात अमिताभ म्हटलं की कोण अमिताभ, फुटबॉल मध्ये मेस्सी एकच, तसं शिवसेना म्हटलं की बाळासाहेब एकच..हे साध लॉजिक या तथाकथित समर्थकांना समजत नाही की उमजून घ्यायचे नाही.
कोण बाळासाहेब असा प्रश्न करतात तेव्हा मला फूल और कांटे मधील अमरीश पुरी ची एन्ट्री आठवते.
तिवारी विचारतो : कोण हो तुम?
उत्तर येत: "नागेश्वर"
तिवारी: कोण नागेश्वर?
उत्तर येत: तुम्हारे बाप कितने है इस शहर मे?
आणि तिवारी चपापतो...
तसं कोण बाळासाहेब हे विचारू नका, *बाळासाहेब एकच one and only हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे...* *फक्त बाळासाहेब*
जय महाराष्ट्र
जयंत जगताप..
Comments
Post a Comment