Posts

Showing posts from January, 2024

बर्बरिक होऊ नका

              *बर्बरिक होऊ नका* आपण सर्व जाणतो की महाभारतात कौरव आणि पांडव लढले. कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही मित्रासाठी त्याची बाजू घेतली. भीष्म पितामह ना सर्व सत्य माहीत असूनही त्यांनी राजधर्म पाळला आणि कौरवांची बाजू घेतली. कृष्णाला दोघेही सारखे असून त्याने सत्य आणि धर्म आणि कर्माची बाजू घेतली. हे सर्व एका एका बाजूला होते एक-एक विचाराने लढत होते. परंतू युद्ध सुरू होण्या अगोदर कृष्णाला सर्वात आधी शस्त्र हाती घ्यावे लागले होते.    जस महाभारत युद्ध होणार आहे हे समजले तसे अनेक योध्ये कुरुक्षेत्रावर येऊ लागले आणि त्यांना योग्य वाटेल त्या पक्षाकडे जात होते. *असाच बर्बरिक नावाचा महाबलशाली योद्धा जेव्हा आला आहे हे कृष्णाला समजले तेव्हा तो नक्की कोणत्या बाजूने लढणार हे जाणून घ्यायला कृष्ण त्याला भेटायला जातो.*  *बर्बरिक कडे अशी शक्ती असते की तो ज्या बाजूने लढेल तो पक्ष कधीच हरणार नाही. जेव्हा कृष्ण त्याला विचारतो आपण कोणता पक्ष निवडला आहे. तेव्हा बर्बरिक म्हणतो, मला जो पक्ष हरतोय अस वाटेल मी त्या पक्षाकडून लढणार. जर कौरव कमजोर झाले तर त्यांचेकड...

*मंदिर उद्घाटन सोहळा दिवस दुसरा - सप्तनद्या जल आणि शाही स्नान सोहळा*

 *काळभैरव मंदिर उद्घाटन सोहळा दिवस दुसरा - सप्तनद्या जल आणि शाही स्नान सोहळा*   सध्या आपण सर्व जण एक सुवर्ण काळ जगत आहोत. कालच म्हणजे 18 तारखेला गुरुवारी अयोध्या मध्ये श्रीरामाच्या मूर्तींना 101 नद्यांच्या जल, तसेच विविध प्रकारच्या दिव्य वस्तू नी शाही स्नान घालून गर्भ ग्रहात घेऊन गेले. असच भव्य दिव्य सोहळा आमच्या महू गावात पार पडला. 25 ते 27 डिसेंबरला आम्ही तो अनुभवला आणि आम्हाला त्याचा भाग बनायचे भाग्य लाभले. आपली संस्कृती कशी आहे हे आयुष्यभर ऐकत आलो पण त्या तीन दिवसात जे करायला लाभलं ते अद्वितीय होत. आपली संस्कृती जगत होतो.   पहील्यादिवशी भव्यदिव्य मिरवणूक पार पडली आणि सर्व गाव भक्ती सगरात बुडाला. गावात फक आनंद, प्रसन्न वातावरण होत. सोबतीला कडक थंडी होती, झुळू झळू येणारी थंड हवा आणि मनाला ऊब देणारी भैरवनाथाच्या आगमनाची ओढ होती. त्या ओढीत कधी पहाट झाली समजलं नाही. ठरल्याप्रमाणे सर्व जण स्नान करून, धोतर नेसून आणि सफेद वस्त्र घालून सोबत घागर, हंडा किंवा कलश  घेऊन गावातील सर्व भावकितील ठराविक असे भक्त मंदिरासमोर जमले. सकाळी सकाळी नग्न पायांनी नदीवर जायचे आणि जल आणायचे ...

ढोलाचा हुकमी एक्का रवी शिंदे

   *ढोलाचा हुकमी एक्का रवी शिंदे..*  लहानपणी म्हणजे 1996 ते 2000 मध्ये उन्हाळ्यात आम्ही 2 ते 3 महिने गावी असायचो. तेव्हा गावात घडलेल्या काही घटना आम्ही भावंडं आणि गावचे मित्र गोष्टी स्वरूपात एकेमकाना सांगायचो.    असच एकदा अजय सांगत होता बामणोली मध्ये ढोलाच्या डावाची सुपारी भेटली होती. श्रीगणेश मंडळाची तरुण पोर ढोल घेऊन सुपारीवर गेली होती. तेव्हा वरातीत असे ढोल आणि लेझिम डाव खेळायच्या सुपाऱ्या असायच्या. आता ती परंपरा dj च्या नदात  संपुष्टात आली आहे.   तर महूच ढोल पथक बामणोलीत पोहचलं. बामणोली सुद्धा मोठं गाव आहे. त्यांचा ही ढोलपथक दमदार आणि तोडीस तोड होत. दोन्ही गावांचे एक एक डाव झाले आणि नंतर दोघात चुरस चालू झाली. *महू चा युवा आणि हुकमी ढोलक्या रवी शिंदे मैदानात आला.* कमरेला ढोलची रस्सी करकचून अवळली. उजव्या हातात दांडका आणि डाव्या हाताने आवाजाचा अंदाज घेतला आणि हळू हळू ताल धरत डाव निघू लागला. बाजूला बामणोली वाल्यांनी पण तोडीस तोड  ढोलक्या आणला. दोन्ही बाजूला डाव रंगात आला. खेळणारे हळू हळू वेगात नाचू लागले, रवी शिंदे जोरजोरात  ढोल वाजवत हो...