बर्बरिक होऊ नका


              *बर्बरिक होऊ नका*
आपण सर्व जाणतो की महाभारतात कौरव आणि पांडव लढले. कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही मित्रासाठी त्याची बाजू घेतली. भीष्म पितामह ना सर्व सत्य माहीत असूनही त्यांनी राजधर्म पाळला आणि कौरवांची बाजू घेतली. कृष्णाला दोघेही सारखे असून त्याने सत्य आणि धर्म आणि कर्माची बाजू घेतली. हे सर्व एका एका बाजूला होते एक-एक विचाराने लढत होते. परंतू युद्ध सुरू होण्या अगोदर कृष्णाला सर्वात आधी शस्त्र हाती घ्यावे लागले होते.  
 जस महाभारत युद्ध होणार आहे हे समजले तसे अनेक योध्ये कुरुक्षेत्रावर येऊ लागले आणि त्यांना योग्य वाटेल त्या पक्षाकडे जात होते. *असाच बर्बरिक नावाचा महाबलशाली योद्धा जेव्हा आला आहे हे कृष्णाला समजले तेव्हा तो नक्की कोणत्या बाजूने लढणार हे जाणून घ्यायला कृष्ण त्याला भेटायला जातो.* 
*बर्बरिक कडे अशी शक्ती असते की तो ज्या बाजूने लढेल तो पक्ष कधीच हरणार नाही. जेव्हा कृष्ण त्याला विचारतो आपण कोणता पक्ष निवडला आहे. तेव्हा बर्बरिक म्हणतो, मला जो पक्ष हरतोय अस वाटेल मी त्या पक्षाकडून लढणार. जर कौरव कमजोर झाले तर त्यांचेकडे जाणार आणि जेव्हा पांडव कमजोर होतील तेव्हा त्यांच्याकडे जाणार. हे ऐकून कृष्ण चिंतेत पडतो.* जर बर्बरिक असच करत राहिला तर सर्व सेना संपेल आणि विनाश होईल. कोणी ही जिंकणार नाही आणि फक्त हाहाकार माजेल. कृष्ण त्याला खूप समजावतो पण तो ऐकत नाही. शेवटी विनाश रोकण्यासाठी कृष्ण युद्ध सुरू होण्याअगोदर बर्बरीकची मान छाटतो आणि उंच ठिकाणी ठेवतो. आणि त्याला फक्त युद्ध बघायला सांगतो. 
यातून बोध हा मिळतो की तुम्ही कितीही श्रेष्ठ असलात तरी निर्णायक क्षणी एक पक्ष, एक बाजू, एक निर्णय, एक विचार ठरवा आणि अमलात अमलात आणा जे दोन्हीकडे डुलत राहतात, ना इकडचे ना तिकडचे असतात त्यांचा बर्बरीक होऊन जातो.. 

धन्यवाद 
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)