ढोलाचा हुकमी एक्का रवी शिंदे

   *ढोलाचा हुकमी एक्का रवी शिंदे..* 

लहानपणी म्हणजे 1996 ते 2000 मध्ये उन्हाळ्यात आम्ही 2 ते 3 महिने गावी असायचो. तेव्हा गावात घडलेल्या काही घटना आम्ही भावंडं आणि गावचे मित्र गोष्टी स्वरूपात एकेमकाना सांगायचो. 
  असच एकदा अजय सांगत होता बामणोली मध्ये ढोलाच्या डावाची सुपारी भेटली होती. श्रीगणेश मंडळाची तरुण पोर ढोल घेऊन सुपारीवर गेली होती. तेव्हा वरातीत असे ढोल आणि लेझिम डाव खेळायच्या सुपाऱ्या असायच्या. आता ती परंपरा dj च्या नदात  संपुष्टात आली आहे. 
 तर महूच ढोल पथक बामणोलीत पोहचलं. बामणोली सुद्धा मोठं गाव आहे. त्यांचा ही ढोलपथक दमदार आणि तोडीस तोड होत. दोन्ही गावांचे एक एक डाव झाले आणि नंतर दोघात चुरस चालू झाली. *महू चा युवा आणि हुकमी ढोलक्या रवी शिंदे मैदानात आला.* कमरेला ढोलची रस्सी करकचून अवळली. उजव्या हातात दांडका आणि डाव्या हाताने आवाजाचा अंदाज घेतला आणि हळू हळू ताल धरत डाव निघू लागला. बाजूला बामणोली वाल्यांनी पण तोडीस तोड  ढोलक्या आणला. दोन्ही बाजूला डाव रंगात आला. खेळणारे हळू हळू वेगात नाचू लागले, रवी शिंदे जोरजोरात  ढोल वाजवत होता, आता त्याचे हात, ढोल आणि शरीर एका लयीत हालत होते. डावा हात रक्तबंबाळ झाला होता पण त्याला त्याचे भान नव्हते. लक्ष एकच होत वाजवणे थांबले नाही पाहिजे. त्याच्यावर अक्खा खेळ चालू होता. सोबत झांज वाला ही साथ देत होता. प्रेक्षक रोमांचित होऊन बघत होते. 1 तास होऊन गेला होता तरी कोणी थांबत नव्हते, घामाच्या धारा निघत होत्या, सर्वांचे रक्त आता गरम झाले होते. कोणतेही भान राहिले नव्हते, लक्ष फक्त एकच थांबायचे नाही. याचा शेवट कसा होणार कोणाला समजत नव्हत सर्व बेभान होऊन गावच्या प्रतिष्ठेसाठी नाचत होते..आणि शेवटी.....शेवटी... ढोलच पान फटल आणि डाव थांबला. पण महू ने बामणोली मध्ये नाव कमावलं. 
*असा हा रवी शिंदे ढोल वाजविण्यात महिर, हुकमी एक्का. प्रयत्नांची शर्थ करणारा ढोलक्या. तुला सलाम. असे अनेक ढोलके आपल्या सातारा भागातील गाव गावात होते आणि आहेत. भविष्यात असे अजून तयार झाले पाहिजेत आणि टिकले पाहिजेत.. ही परंपरा टिकली पाहिजे.. म्हणून ढोल चे खेळ गावा गावात मागवत रहा. 

धन्यवाद 
जयंत जगताप 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)