श्रेया 14 वा जन्मदिवस शुभेच्छा
मामा च पत्र
आज तू 14 वर्षाची होत आहेस. कुमार वयातून आता तू किशोरवयीन होत आहेस. या तुझ्या जन्मदिनानिमित्त मला तुला हे पत्र लिहावेसे वाटले आहे.
श्रेया तू नेहमी माझी शेरू होतीस आहेस आणि राहशील.
मला आजही आठवते तुझा जन्म झाला तेव्हा वाशी च्या महानगर पालिकेच्या हॉस्पिटल मध्ये. 2 वर्षाचा हर्ष घेऊन मि तिथे आलो होतो. तू झालीस आणि लगेच हर्ष मोठा वाटू लागला, तो दादा झाला. तुझं नाव माझ्या आवडीने ठेवले आहे. तुझी आणि तुझ्या आईची काळजी घेण्यासाठी नवजात शिशु कक्षाबाहेर रात्रीचा मी थांबायचो. तुझा रडण्याचा आवाज ऐकून तुझ्याकडे बघायचो पण आत येता येत नसायचे. तू 6 महिन्याची झालीस आणि आपलं सेक्टर 20च घर बघायला तुला घेऊन गेलो होतो.
पहिल्या पासून तू तुझ्या पप्पा सारखी शांत स्वभावाची आहेस. तुझं निरीक्षण खूप स्मूक्ष असत. तू बोलतेस कमी आणि खूप जास्त observe करत असतेस.
लग्नानंतर मामी ची पण तू खास झाली आहेस. आराध्य ला तू जितकी चांगली समजतेस ते बघुन मला तुझा अभिमान वाटतो.
तू अभ्यासात हुशार आहेसच रांगोळी पण छान काढतेस. आता तुझं खरं करिअर सुरू होत आहे. तुला डॉक्टर व्हायचं आहे. आणि त्या दिशेने तू योग्य प्रयत्न करत आहेस. यासोबत तू शास्त्रीय नर्त्य शिकत आहेस त्यात निपुण हो. आणि हो तो पोहायला शिकायचे आहे हे माझं तुझ्यासाठी स्वप्न आणि लक्ष आहे.
अशीच मोठी हो प्रगती करत रहा. तुझ्या सोबत तुझा मामा आणि मामी सदैव आहोतच. कोणतंही मानसिक, वैचारिक सल्ला मसलत आपण करू शकतो हे लक्षात ठेव.
जन्मदिनाच्या आणि पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा श्रेया.
तुझा मामा आणि मामी..आणि आराध्य..
Comments
Post a Comment