स्सजन आणि गवनेर
*स्सजन आणि गवनेर*
1985 ते 1995 या काळात आमच्या जगताप घरात 1 बैल जोडी होती. तो काळ तसा बैल गाई-म्हशी, शेळ्या,कोंबड्या यांचा होता. गावात गाई म्हशींचे शेणाचे पौ आणि पायाचे खुरानी तयार झालेला गुरांचा रस्ता असायचा. आमच्या जगताप वाड्याची शान म्हणजे हे 2 बैल होते. स्सजन आणि गवनेर. माझे चुलते भाऊ यांनी यांच्यावर विशेष जीव लावला होता.स्सजन धिप्पाड, ताकतवर आणि शांत मवाळ होता त्याची शिंगे सरळ नसून काहीशी वाकडी होती, रंग पांढरा शुभ्र आणि हाडाने लांब. मारक नव्हता. गवनेर हा आईच्या माहेर म्हणजे वाहागाव वरून आजोबांनी खोंड असताना दिलेला. सरळ शिंगचा थोडासा फिक्कट सफेद रंगाचा गवनेर काटक, चतुर आणि मस्तीखोर. बांधा चांगला होता पण स्सजन समोर कमी वाटायचा. सजन गावातील तगड्या बैलात यायचा. गवनेर वयाने मोठा होता पण स्सजन बरोबर त्याची छान गट्टी होती. एकमेकांना सांभाळून औत, बैलगाडी पेरणी करायचे वडील सांगायचे गवनेर औता ला मान चोरायचा, सरळ चालायचा नाही पण स्सजन त्याला सरळ ठेवायचा. पण एकदा मनावर घेतले की सज्जनला पण फेस काढायचा.
शेवट पर्यंत हे बैल घरी होते. म्हातारपणात तर गवनेर बसत बसत पेरणी केली. सज्जन त्यापेक्षा तरुण होता आणि दोघात विशेष नात होत. त्याने गवनेर ला चांगलं सांभाळून घेतलं. हे बैल जाऊन आता 25 वर्ष झाली. त्यानंतर जोडी नाही राहिली. माझे चुलते भाऊ यांनी त्यानंतर 3 बैल घेतले, पाखऱ्या, आणि अजून 2. तिसऱ्याच नाव परत स्सजन ठेवलं होतं. पण अजूनही ते जुनी जोडी डोक्यात घट्ट आहे. आज गवनेर हा शब्द वाचून डोळ्यासमोर त्या आठवणी जाग्या झाल्या. गवनेर म्हणजे गवर्नर आणि स्सजन म्हणजे सज्जन. पण आमच्यासाठी ही नवे म्हणजे ते बैलच आहेत.
या वर्षी गणपतीत गावी मुलाला खेळवत असताना असच 1 बैल जोडी च एकमेकांत कस मैत्री आणि प्रेम असत हे बघितलं. एकमेकांचं कपाळ मान खाजवण्यासाठी ते एकमेकांच्या शिंगचा उपयोग करून घेतात. ते प्रत्यक्षात मी बघितले . विडिओ बनवायला थोडा उशीर झाला पण थोडं त्यात घेता आल. खाली विडिओ ची लिंक दिली आहे. आणि सोबत स्सजन गवनेर चा फोटो जोडत आहे.
https://youtube.com/shorts/-pGqvi2SKCo?feature=share
धन्यवाद
जयंत जगताप.
Comments
Post a Comment