एक से भले दो

         *एक से भले दो*

लेखक जयंत जगताप 7738022343

चीन आणि भारत या देशात लोकसंखेचा भस्मासुर वाढला आणि लोकसंख्या नियंत्रण करायला चीन मध्ये सक्ती ने फक्त 1 अपत्य, तर भारतात हम दो हमारे दो चा नारा दिला गेला. 

सुरवातीला चीन नियंत्रणात अग्रेसर वाटला, आता भारत 1 नंबर ला जाईल असे वाटू लागले. पण हळू हळू 1 अपत्य ही संकल्पना घातक आहे ही चीन ला समजू लागले. अनेक जोडपी फक्त मुलगा असेल तर जन्म देऊ लागली नाहीतर अबोरशन करू लागली. अनेकांनी अपत्य नकोच अशी भूमिका घेतली. लहान मुलांचे तस्करी, चोऱ्या वाढू लागल्या, 1 टी मुले मानसिक आजाराची बळी पडत आहेत.  या समस्ये वर मात करायला आता चीन सरकार प्रयत्न करत आहे. दुसरे अपत्य झाल्यास त्यास सरकारी अनुदान देत आहेत, नोकरीत संधी दिली जात आहे, शिक्षण आणि आरोग्य सेवा मध्ये सूट किंवा मोफत दिले जात आहे.

आता आजकाल भारतात मध्यम वर्गात, शक्यतो जिथे दोघे ही नोकरी करत आहेत अशा कुटुंबात 1 मुलाचा/मुलीचा जो ट्रेंड चालू आहे. 1 अपत्य सांभाळायला सोपे, खर्च कमी, नोकरी करून त्याला बघता येते, विभक्त कुटुंब अस अनेक कारणे असतात आणि काही अंशी ती योग्य आहेत. 

पण अस करून आपण आपल्या मुलाला/मुलीला पांगळ बनवत असतो, बहीण-भावाचे , भाव-भावच, बहीण-बहीणच नात काय असत ते या चिमुकल्या ना अनुभवू देतच नाही. आपलं बालपण ज्या आपल्या भाऊ बहीण च्या आठवणीत आपण आठवतो त्या आठवणी यांना देतच नाही.  उद्याच काका, मावशी, मामी, आत्या ही नाती आज आपण मारत आहे. याना आपण एकलकोंडी करत आहे. जर एकत्र कुटुंब असेल तर एक वेळ 1-1 अपत्य चालून जाईल पण विभक्त कुटुंबात अशी मुलं अनेक प्रसंगी एकटी पडतात. घरात समवयीन भाऊ किंवा बहीण असेल तर गप्पा,खेळ, मस्ती, अभ्यास, एकमेकात वाटून घेण्याची वृत्ती, भावनात्मक शरिंग करण्यास एक हक्काचं कोणी असत. एक अपत्य म्हणजे त्याला आपण आपल्या सुखसोयीसाठी मोठं करतोय अस वाटत. 

त्यासाठी आपलं सरकारने पण दोन चा पुरस्कार केलाय ते एक अर्थाने योग्य आहे. वयस्कर आई वडील आजी आजोबा अजुनही म्हणत असतात, ऐका ला दोन होऊ दे. आपण मात्र मला झेपणार नाही म्हणून टाळतो तेव्हा खरंतर आपल्या बाळाचे सपोर्ट सिस्टिम आपण टाळत असतो. भले शिक्षण जमेल तसं द्या, हुशार असतील तर ती चमकतीलच. पण त्या भीतीने 1 वर नका थांबू. एक से भले दो हे योग्यच आहे. 

धन्यवाद



Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)