सोनू बेहरा - Red chex

            *सोनू बेहरा - Red chex*
सततच्या प्रवासामुळे नवीन लोकांना भेटत राहणे आणि नवीन ओळखी करत राहणे, त्या माणसां बद्दल जाणून घेणं हा छंद झाला आहे. त्यात काही वेगळं करणारी भेटतात आणि आठवणीत राहतात. 
या वेळी घरी कोपेरखैरने मध्ये होतो. दिवसभरच्या व्यस्त वेळापत्रकातुन रात्री 10 वाजता जेवण करून मोकळा झालो. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता भुज ला जायचं होत, आणि आठवलं की नवीन बेल्ट आणि बनेन(वेस्ट) घ्यायचं आहे. रात्रीचे 10:30 वाजले होते. सहसा या वेळेला कोपेरखैरनेतील दुकान बंद होतात. पण प्रयत्न न करता थांबन मला जमत नाही. मग निघालो बाहेर, सेक्टर 7-8 च्या मधील गार्डन रस्त्यावर सर्व दुकाने बंद झाली होती. चालत चालत स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याकडे निघालो. गार्डन पासून जवळच एक कपड्याच दुकान उघड दिसलं. पटकन त्या दुकानात गेलो आणि बनियान आहे का विचारल. त्याने हो बोलून 1-2 ब्रँड काढत होता, तोपर्यंत मी इतर कपडे न्याहाळत होतो. चेक्स चे शर्ट आणि जीन्सच्या पॅन्ट खूप होत्या. त्याने बनियान काढले ते घेऊन मी शर्ट ची चौकशी केली आणि गूगल पे ने पैसे भरण्यासाठी QR कोड मागितला. तो नव्हता म्हणून त्याने मोबाइल no सांगितला. 
मोबाईल no type केला आणि नाव आलं *सोनू बेहरा*..
इथे माझी चौकस वृत्ती जागी झाली 
मी: बेहरा मतलब ओरिसा के हो क्या?
तो : हा.. 
मी: जाजपुर के हो क्या? 
आता तो आश्चर्याने माझ्याकडे बघू लागला.. आणि बोलला..
"एकदम सही पकडे है आप, आपको कैसे पता"
मी: मै पुरा भारत घुमता हु, ओरिसा मस्त है एकदम natural.. 
तो: मेरा गाव वो है मगर मै कभी गया नही.
मी: कभी भी नही गये? क्यो? जन्म कहा हुआ? असे 2-3 प्रश्न मी फेकले आणि त्याने जे सांगितले ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो..
तो: "मेरे पापा ओरिया(ओरीसा) है, मम्मी मंगलोर (कर्नाटक) की है, मेरा जन्म आसाम मे हुआ है, पला बडा आसाम हु, अभि मास्टर डिग्री लेने के लीये यहा बंबई आया हु..  arciology मे मास्टर कर रहा हु, अजंठा लेणी के उपर रिसर्च प्रोजेक्ट लिख रहा हु, साथ मे ये दुकान चला रहा हु". लेकिन अबतक कभीबी गाव नही गया हु.. वो गाव है मेरा बस इतना ही पता है."  
हे ऐकून मी चकित झालो.. तोंपर्यंत 11 वाजले होते पैसे देऊन बाहेर आलो आणि त्याच्या विचारात घराकडे निघालो पण अर्ध्यातून माघारी फिरलो, मला त्याचा फोटो काढायचा होता. त्याच्यावर लिहायचं आहे.. युवा मुलांना प्रेरित करणारा ह्याचा प्रवास आहे. 
पण मी परत जाई पर्यंत दुकान बंद करून तो निघून गेला होता. तो नाहीतर त्याचे दुकान तरी अस म्हणून मी दुकानाचा फोटो काढला आणि उद्या सकाळी यावर लिहणार हे ठरवून घरी आलो.
धन्यवाद
लेखक जयंत जगताप
स्थळ मुंबई एअरपोर्ट - मुंबई ते भुज प्रवासात.. वेळ ५:0५AM.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)