चिलबल चा प्रवास

--///////////// *चिलबल चा तकटा*///////////----
फेसबुक वरील ओळखीने एक दमदार लेखक माहीत झाला आणि त्यांचं गावाकडील अनुभवांचं, प्रवासाच, बालपणीच्या आठवणींचे ललित लेखन असलेलं त्यांचं पुस्तक ऑनलाइन मागवल. दिवाळीत नवीन काहीतरी वाचायला मिळेल अस ठरवून सुरवात केली. 
हळूहळू वाचताना लक्षात आले की हे एकसाथ किंवा वेगात वाचून संपवावे अस लेखन नाही आहे. प्रत्येक गोष्ट वाचून त्या काळात जाऊन आपण डोळयांसमोर बघत आहे अशी आहे. त्यामुळे ठरवलं की प्रत्येक विमान प्रवासात एक-एक गोष्ट वाचून अनुभवायची. सुरवात ही झाली, 5 प्रवासात 6 गोष्टी पूर्ण केल्या. विमानात बसलो पुस्तक आपल्या पुढच्या सीटच्या मागील भागात पेपर-पुस्तके ठेवायला जागा असते तिथे ठेवायचे . मग विमान आकाशात झेपावायला आणि स्थिरस्थावर व्हायला 20मिनिटे घेते. त्या वेळात मी डोळे बंद करून निवांत होतो. मग एअर होस्टेस चा आवाज येतो "कुर्सी की पेटी बांधने का संकेत अब बंद हो चुका है, लेकिन अपनी सुरक्षा के लिये आप कुर्सी पेटी बांधे रख सकते है". 
यानंतर मी पुस्तक काढून वाचन चालू करतो. पण यावेळी झोप लागली ते डायरेक्ट विमान भुवनेश्वरला उतरले तेव्हा जाग आली. घाई गडबडीत मी विमानातून उतरलो. गाडी पकडून 200 किमी दूर धामरा पोर्ट वर गेलो, 5 दिवस कामात व्यस्त होतो. काम पूर्ण करून परत भुवनेश्वर ला आलो विमानात बसलो आणि बॅगेत पुस्तक शोधू लागलो. पुस्तक काही सापडले नाही. आठवू लागलो पण काही आठवत नव्हते कुठे विसरले ते. मग डोळे बंद करून विचार करत बसलो आणि आठवले येताना विमानात ठेवले ते घेतलेच नाही. मनाला हुरहूर लागली. एक चांगले पुस्तक अर्धेच वाचून झाले आणि हरवले. चिलबल हरवले आणि मनाची चीलबिचल झाली. काय करायचे याचा विचार करू लागलो आणि 2 पर्याय समोर आले. पाहिला- Airseva app वर पुस्तक हवल्याची तक्रार दाखल करायची आणि पुस्तक सापडतय का बघायच आणि दुसरा सरळ नवीन पुस्तक मागवायचे. अर्थात मी अगोदर पहिला पर्याय निवडला. कारण पुस्तक असच वाया नको जायला. अवघड होता पण प्रयत्न करायचे ठरवले. रीतसर तक्रार केली आणि 2 दिवसात फोन आला तुमचे पुस्तक भुवनेश्वर एअरपोर्ट वर लॉस्ट अँड फाउंड सेकशन मध्ये जमा केले आहे. मी मुंबई एअर पोर्ट वर पाठवण्याची विनंती केली पण नियमानुसार ते शक्य नव्हते. तिथे जाऊन ते स्वतः घ्यावे लागणार होते. आता काय करायचे? पुस्तकासाठी परत भुवनेश्वरला प्रवास करावा लागतोय काय? मग मी परत कॉल करून विचारले दुसरं कोणी आलं तर चालेल का पुस्तक घ्यायला. त्यांनी हो म्हटले पण त्यासाठी मला लेखी ना हरकत पत्र द्यावे लागणार होते त्याशिवाय ते दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकत नव्हते. माझा कंपनीतील मित्र जेना जो भद्रकला राहतो, त्याला कॉल केला. तो त्याच्या पुढच्या टूर वेळी एअरपोर्ट वर येऊन पुस्तक घेईल आणि मला कुरिअर करेल. जेना हो बोलला. 15 दिवसानी तो एअरपोर्ट वर आला, मला कॉल केला, मी नाहरकत पत्र लिहून पाठवले. त्यानंतर ही खूप वेळ फोन वर बोलून शेवटी पुस्तक जेना ला दिले. पुस्तक घेऊन जेना कामानिमित्त मध्यप्रदेश राजस्थान असे फिरून 20 दिवसानी परत ओरिसात गेला. त्यासोबत पुस्तक ही प्रवास करत होते. 1 महिन्याने ऑफिस चे काही सामान मुंबई हेड ऑफिसला सतीश नायकला पाठवायचे होते. त्या समानाबरोबर त्याने पुस्तक ही कुरिअर केले. 
पुस्तक मुंबई ऑफिस ला पोहचले पण कामानिमित्त मी बाहेर फिरत होतो त्यामुळे परत 1 महिना पुस्तक मुंबई ऑफिस मध्ये राहिले. शेवटी जानेवारी मध्ये आमची गेट टूगेदर मीटिंग होती तेव्हा जेना ही आला होता. पण पुस्तक अगोदर येऊन थांबले होते. 
अशा प्रकारे चिलबल चा महाराष्ट्र- ओरिसा- मध्यप्रदेश- राजस्थान- ओरिसा  आणि परत महाराष्ट्र असा प्रवास झाला. चिलबल च्या आनंद पवार यांचा जसा लहानपणी गुर शोधताना तकाटा झाला तसा चिलबलचा भारतभर तकाटा झाला.
धन्यवाद
 जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)