सेनापती

                       *सेनापती*
सरसेनापती, सेनापती, वजीर, commander in chief, किंवा General. कोणत्याही भाषेत हा शब्द भारदस्त आहे. हे पद इतकं मोठं आहे की ते ऐकून देखील मन रोमांचित होते. मला सर्वात जास्त कुहुतल, सन्मान वाटतो ते याच पदाचा. जर मला संधी मिळाली की राजा बनणार की सेनापती, तर मी सेनापती निवडेन. जर राज्य हे मंदिर मानले तर राजा त्या मंदिराचा कळस असतो तर सेनापती हा त्या मंदिराचा मुख्य खांब असतो. त्याच्यावर सर्व डोलारा उभा असतो. तो जितका कसदार, मजबूत, हुशार असतो तितके ते राज्य सामर्थ्यशाली असते. 
  ययातीचा सेनापती कच, पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न  (Dhristadyumna) जो शेवट पर्यंत सेनापती राहिला. सम्राट अशोकाचा सेनापती बिंबिसरा, मगध राज्याचा सेनापती चंद्रगुप्त मौर्य, शिवाजीमहाराजांचे सेनापती, नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, galdiator सिनेमातील रोमन साम्राज्याचा सेनापती मॅक्सिमस, फ्रेंच सेनापती नेपोलियन बोनापार्ट आणि मराठी साम्राज्य अटकेपार नेणारे महान सेनापती पेशवा बाजीराव, अशा अनेक महान सेनापतीमुळे ती साम्राज्य बलाढ्य झालीत आणि महान झालीत. 
राजा जर वंशपरपरने येत असेल तर सेनापती त्याच्या कर्तृत्वावर येतो. साधा सैनिक देखील सेनापती बनू शकतो. कधी राजा कमकुवत असेल तर राज्याचा भल्याकरिता सेनापती सूत्र हातात घेतो. जनता, सैन्य आणि राजा यांच्यातील दुवा हा सेनापती असतो. राजा नेतृत्वहीन असला तरी सेनापती ला नेतृत्वनिपुन असावे लागते. 
म्हणून सेनापती बना, कर्तृत्ववान बना.. आणि आपले देश, राज्य महान करा. 
तुमचे आवडीचे सेनापती चे नाव कंमेंट मध्ये नक्की सांगा.. 
धन्यवाद
जयंत जगताप
7738022343. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)