युद्ध कोरोना विरुद्ध भाग 2
युद्ध कोरोना विरुद्ध
भाग 2
मुंबई
भारताला जगाशी जोडणारी मुख्य दोन प्रेवशदारे - दिल्ली आणि मुंबई . दिल्ली देशाची राजधानी, केंद्रशासित, केंद्र राज्य आणि महापालिका असा तिहेरी संगम एकावेळी काम करत आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी, एका राज्याची, महाराष्ट्राची राजधानी, जगातील सर्वात जास्त व्यस्त असलेले विमानतळ, सर्वाधिक गर्दी असलेले लोकल रेल्वे, सव्वा कोटी लोकसंख्या असलेले शहर आता ऐका किल्ल्यात रूपांतरित होत आहे, दोन्ही सरकारे केंद्र आणि राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सर्व उपाय योजना करत आहेत पण या किल्ल्यावरचे लोक काही या किल्लेदाराना साथ देत नाहीयेत.
बाहेरच्यांचे सोडा पण आपण जे लढवय्या इतिहास सांगतो ते आपण लोक पण पटापट गावाकडे पळत सुट्लोय.
यावेळी मला आठवतो तो रामसेज किल्याचा लढा, 1-2 महिने नाही तर तब्बल 2 वर्ष हा किल्ला लढला, पण आतलं कोण बाहेर गेला नाही की बाहेरचा कोण आत येऊ शकला नाही.
आज तशीच परिस्थिती आहे आपण जेवढे या मुंबई किल्ल्यातून बाहेर पाळणार तेवढा आपला शत्रू कोरोना बलाढ्य होणार आहे.
आज गरज आहे त्या मावळे सारखे वागायचे, राहायचे, आपला संयम, आपला इतिहास पुन्हा एकदा जिवंत करायची वेळ आहे.
आपला किल्लेदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यासाठी सर्व तयारी करत आहे, आपल्याला फक्त त्यांच्या सूचना पाळायाच्या आहेत पळायचे नाही आहे फक्त आहे तिथे थांबायचे आहे.
क्रमश...
साभार
जयंत पांडुरंग जगताप
Comments
Post a Comment