युद्ध कोरोना विरुद्ध भाग 1
युद्ध कोरोना विरुद्ध
भाग 1. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जगाच्या शब्दकोशात एक नवीन शब्द आला कोरोना.
विज्ञान जे पृथ्वीच्या ही पोटात घुसले व अनु रेणू पेक्षाही लहान कण शोधला ज्याचे नाव गॉड पार्टीकल ठेवले आहे त्या विज्ञानच्या ही पोटात ज्याने गोळा आणलाय, तो हा शब्द.
संपूर्ण जग एक दमात प्रदिक्षणा घालून पूर्ण करणारा मनुष्य एक घरात एका छोट्या रूम मध्ये, एक एक दम पूर्ण करायची पराकाष्टा करत आहे.
कोणतंही आजार बर करायची धमक असलेला अमेरिका नैसर्गिक मानवी शरीरच नाही तर प्राण्याचे सुद्धा नको नको प्रयोग करून वेगवेगळे नवीन अनसिर्गिक जीव तयार करनारे आपले मानवी मेंदू, सुपर कॉम्पुटरला ही हारवणारा मानवी मेंदू, एक क्षणात पूर्ण अंतराळ फिरणारा हा मेंदू चक्क स्तब्ध (हँग) झालाय, पुन्हा एकदा त्याला रिव्हर्स गियर टाकून मागे जावे लागत आहे, कुठे चुकलंय हे शोधावे लागत आहे, पैश्याच्या मागे लागलेल्या हे मन परत एकदा फक्त रोजच्या गरजा मिळाल्या तरी चालतील इतके समाधानी झालेले धाकवत आहे.
गावाकडे जायला कचकूच करणारे , पाणी नाही, शेतात काम करायला नको म्हणून शहराकडे राहणारे, फक्त चार चाकी असेल तरच जाऊ म्हणणारे, भेटेल ती गाडी , एक पायावर उभे राहून, हवे तेवढे पैसे देऊन, घामाने ओलचिम्ब होऊन का होईना पण गावी जायला धडपडत आहेत. जे आईबाप आपल्या नातवंड ना भेटायला तरसायचे पण गावची भाषा नको शिकायला, उन्हात काळ नको पडायला म्हणून त्यांची मम्मी त्यांना त्यांच्या आजीआजोबांकडे जाऊन देत नव्हती ती आज नाईलाज का होईना पण आनंदाने घेऊन जात आहे.
क्रमश.....
साभार
जयंत पांडुरंग जगताप
Comments
Post a Comment