*दंडाच लुगडं आणि तडजोड*

                     *दंडाच लुगडं आणि तडजोड*
आनंद पवार यांच चिलबल ही ललित कादंबरी वाचून आपलं लहानपण पण आठवत. काही आठवणी अशा असतात की ज्याना समांतर संदर्भ भेटला किंवा तसच काही वाचनात आल तर परत आठवतात नाहीतर मेंदूत कुठेतरी खोल दडून राहतात. 
त्यांचीबदंडाच लुगडं ही गोष्ट वाचली आणि आठवलं की आपल्या लहानपणी पण आईने आपल्यासाठी अशीच मोठी तडजोड केली होती. तेव्हा त्या लहान बुद्धीला फक्त त्याला काय हवं ते दिसत होतं आज ते आठवलं की आपल्या आई वडिलांचा त्याग दिसतो.  तर गोष्ट आहे सण1990- 91 ची.  तेव्हा आम्ही गावी राहत होतो. एकत्र कुटुंबात होतो, वडील मुंबई ला कामाला होते, आपले हट्ट आई किंवा आजी कडे पुरवून घायचे.  तर आज ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आहे तिथे गावची तालीम होती. बंदिस्त खोली मध्ये, पारंपरिक प्रकारची तालीम गावकऱ्यांनी तयार केली होती. दरवाजातून आत जाताच, 5 फूट रुंद कट्टा व्यायाम करायला आणि मग 15 बाय 15 चा मोठा, 3 फूट खोल चौकोनी खड्डा. ज्यात बारीक लाल माती टाकली होती.  तालीम गावात तयार झाली होती आणि लहान मोठी पोर संध्याकाळी तालमीत व्यायाम करून आणि कुस्तीचा सराव करत असत. मी तेव्हा 5 -6 वर्षाचा असेन. मला आठवत बाजीराव मास्तर तेव्हा तालमीत आमचा व्यायाम करून घायचे आणि एकमेकात कुस्ती लावत असत. तेव्हा तालीमत जायचं तर लंगोट पाहिजे म्हणजे पाहिजे. आई कडे मी हट्ट केला आणि आई ने  एक निळ्या रंगाचं ब्लाऊज पीसच कापड घेऊन देवळासमोर दर्जीला सांगून मला लंगोट तयार करून घेतला. मग तालमीत जाऊन लंगोट लावून मोठी पोर जो सांगतील तो व्यायाम करायचा आणि सांगतील त्याच्याबरोबर कुस्ती खेळायची. मला आठवते ती बाजीराव मास्तरांचा छोटा मुलगा पिंक्या आणि माझी पहिली कुस्ती लावली होती. मी अंगा काठीने बारीक पण चिकाटी जबरदस्त असायची. माझी शरीरयष्टी बघून समोरचा गाफील राहायचा आणि इथेच मी डाव मारायचो. पुढे 1993 ला आम्ही नवी मुंबईत राहायला आलो आणि पुढं त्या तालमीच काय झालं ते आठवत नाही पण आता त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आहे. 
असो तर अशा या तालमीच्या हट्टासाठी आई ने केलेली तडजोड आठवली आणि मन भरून आलं. 
धन्यवाद
जयंत जगताप
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)