आरुद्र इलेव्हन 2023 संघ
*आरुद्र इलेव्हन* *2023 संघ*
*आराध्य* आणि *रुद्र* यांच्या नावातून नाव तयार झालेला *आरुद्र इलेव्हन* हा संघ. खरतर संघाचा *मेंटर आहे तो विजय जगताप*. मला फक्त क्रिकेट खेळायचे होते. त्याने मला संघमालक बनवले. संघ तयार झाला होता पण कोणाला कोणाचा खेळ माहीत नव्हता. विजयला सर्व खेळाडू चा खेळ माहीत आहे. कोणाला कधी आणि कसं प्रोसाहित करायचं हे त्याला सुरेख जमत.
गेल्यावर्षीचा आणि यावर्षीचा सुद्धा स्टार बॅट्समन *शुभम धोंडे (बाबू)* आमचा कर्णधार होता आणि राहील. अचूक टायमिंग साधून कमी ताकत लावून चौकर मारणे ही त्याची कला आणि तितकीच अचूक खोल गोलंदाजी टाकून समोरचा संघ जखडून ठेवणे त्याला जबरदस्त जमते. फायनल ला 2 ओव्हर मध्ये याने बलाढ्य ऋषी इलेव्हन संघ गारद करून टाकला.
प्रत्येक संघात एक आक्रमक खेळाडू लागतो जो समोरच्या संघात दहशत निर्माण करतो. त्याच्या बालिंग टाकायला येण्याने बॅट्समन आणि बॅटिंग ला आला की बॉलर सुद्धा अवसान टाकतो तो आमचा विराट म्हणजे *सोमेश उबाळे*. जबरदस्त आक्रमकता भरलेला सोमेश मैदानात असेल तर विजय पक्का हे समीकरण असते. भेदक आणि फास्ट बॉलिंग आणि तलवार चालते तशी बॅट वापरून याने संघाला तारले. जेव्हा शुभम ने फॉर्म गमावला तेव्हा सोमेश ने जबाबदारी घेऊन सेमी मध्ये तारले आणि फायनल मध्ये तर एक ओव्हर आणि गेम ओव्हर अशी करामत केली.
समोर शुभम आणि सोमेश असेल तर त्यांना हवा एक शांत आणि विश्वासू सहकारी जो बॉल न खाता stryak देईल आणि हवे तेव्हा 1-1 रन काढून धावफलक हलता ठेवेल. तसेच इतर संघात चांगले बॉलर होते, बॅट्समन होते पण नव्हता तो चांगला विकेट कीपर. जो आमचा फायनल चा ट्रम्प कार्ड ठरला. *अनिकेत चरहाटे*. विरुद्ध संघाचे महत्वाचे फलंदाज गाफील ठेवून स्टंपिंग आणि रन आऊट करून फायनल सामना क्षणात फिरवला. शांत आणि संयमी असा आमचा द्रविड म्हणजे अनिकेत.
हे तिघे आमचे युवा आणि प्रमुख खांब आहेत. त्यानंतर आला तो *अनिल कोंढाळकर*. मला माहित होते हा सुंदर ढोलकी वाजवतो, पण तितकंच सुंदर बॅट फिरवून चौकर काढतो हे इथं समजलं. महत्वाच्या मॅच मध्ये अनिल वेळेला धावून आला. सोबत लेग side ला फिल्डिंग याच्या जीवावर होती.
हे चौघे सहसा आम्हाला बॅटिंगला जायची गरज भासू देत नसत. पण फायनल ला जेव्हा अनुभवाची गरज लागली तेव्हा आला अनुभवी *समीर चिकने*. Pressure कस हाताळायच याची अचूक माहिती याला आहे.
संघ बनतो तो सर्वांच्या सहकार्यातून. ना फलंदाजी ची आशा ना गोलंदाजी साठी मागणी. पण दिलेली कामगिरी चोख पार पाडणारा आमचा *हुकमी एक्का म्हणजे निखिल शेलार*. ऑफ side ला सर्व क्षेत्ररक्षण जबाबदारी याने पार पाडली, महत्वाचे रन आऊट आणि रन वाचवून याने इतरांचे काम सोपे केले.
*बलाढ्य भिंत बनून उभा राहिला तो विघ्नेश नवघणे* न कचरता जणू फलंदाजाला आव्हान म्हणून हा उभा राहिला होता.
एक मॅच मध्ये खेळून *हर्ष चिकने* ने छान क्षेत्ररक्षण केले आणि संघाला *बॅक up* म्हणून उभा राहिला.
संघाला वेळेला काहीही मदत करायला तयार असणारा आमचा *सुनील नवघणे* टीशीर्ट असो की शूज. काहीही लागले की सुनील ला बोलवा. जणू हा आमचा *सपोर्ट स्टाफ* होता.
*विजय जगताप* चे मैदानात असणेच एक ऊर्जा निर्माण करते. मला प्रेरित केले की मोठी कामगिरी करतो हे त्याला पक्के ठाऊक आहे आणि आव्हान स्वीकारणे मला आवडते.
शेवटी ज्यांनी आम्हाला 57 रन मारले त्याना फायनल मध्ये फक्त 9 धावामध्ये गुंडाळून bounce back कशाला म्हणतात हे दाखवले आणि SSPL 2023 वर आरुद्र चे नाव कोरले.
धन्यवाद सर्वांचे..😊😊😊
काही राहिले असेल किंवा चुकले असेल तर क्षमा असावी.
आपलाच
जयंत जगताप
Comments
Post a Comment