मोहीम
*शेवटपर्यंत लढणारे मराठे*
एखादी मोहीम ठरली की ती पूर्ण होईपर्यंत शेवट पर्यंत कार्यरत राहणे, लढणे, संकट मोडून काढणे हे मराठ्यांचे स्थायी भाव आहेत. जर आपण स्वतःला मावळे म्हणतो तर आजही हे गुण आपल्याला दाखवणे गरजेच आहे.
आजच्या काळात आशा मोहीम म्हणजे आपल्या गावात, परिसरात, समाजात, होणारे सार्वजनिक कार्य. एखाद काम हाती घेताना सुरवातीला सार्वजनिक मीटिंग, विचारविनिमय सभा घेतल्या जातात. अशा सभा मधून ते कार्य कसे पार पाडले जाणार, निधी कसा जमवायचा, कामच स्वरूप काय असेल, किती वेळात ते कार्य पूर्ण केले जाईल, काय अडथळे येऊ शकतात हे समजते. अशा सभा मध्ये काही शंका असतील तर विचारल्या पाहिजेत, जर विरोध असेल तर तो का? हे कारणांसहित सांगितले पाहिजे. समाज मला नाव ठेवेल, वेठीस धरेल, मी का बोलू? विरोध करणारा मी एकटाच तर नसेन ना? असा विचार जर शांत बसले तर होकार देणारे जास्त आहेत असं समजून कार्य प्रारंभ होते. मग इथे आपण या मोहिमेचा भाग असतो आणि सर्वांसोबत चालणे आपले कर्तव्य असते.
मग जेव्हा हे सार्वजनिक कार्य प्रगतीपथावर जाते, त्यासाठी निधी जमा करायचा असतो, तेव्हा हे सुप्त विरोधक गट करून कारस्थान चालू करतात. निधी न देणे, चालू कार्य कसे चूक आहे हे एकमेकांना सांगत बसने. कार्य करणारे पूर्णपणे पारदर्शक व्यहवार दाखवतात तरी काहीतरी अंदाज लावून चालू कार्यात काहीतरी गफला होतोय आशा अफवा पसरवणे, स्वतःची वैयक्तिक समस्या या कार्यपेक्षा मोठी करून उगाच मांडून विषय भरकटत ठेवणे. अशा विचारधारा मोहिमाना घातक असतात.
सार्वजनिक कार्य पार पाडणारे आवश्यक असतात तसेच ते चूक असेल तर विरोध करून कार्य व्यवस्थित करून घेणारे विरोधक ही आवश्यक असतात. पण... पण कार्य न करता, विरोध न करता, सहकार्य न करता फक्त आतून आतून कार्यात अडथळे आणणारे, पडून राहणारे, घोंगडी भिजत ठेवणारी मानसिकता असणारे घातक असते. यातून गावाचा, समाजाचा विकास दुरावतो. आपल्याकडे होतकरू तरुण असून देखील एकजुटीचा अभाव असल्यामुळे आपण अपेक्षित यश मिळवत नाही आणि इतर गावांची उदाहरणे देऊन आपल्याच लोकांना डिवचत राहतो.
सार्वजनिक कार्याच्या मोहिमा तर पूर्ण होणारच आहे. ते झाल्यानंतर उगाच थयथयाट करण्यापेक्षा चालू कार्यात सहभागी व्हा आणि ते योग्यपणे पूर्ण करा किंवा करून घ्या.
जय शिवराय
Comments
Post a Comment