conNEXTion 2025

"Body follows the mindset and journy follows the goal" 
मागील आठवड्यात आमची कंपनीची वार्षिक मीटिंग लोणावळ्यात पार पडली. मीटिंगचा उद्देश होता अनेक नवीन सह कर्मचाऱ्यासोबत भेटणे, तोंडओळख करून घेणे, चांगली कामगिरी केल्याला सहकाऱ्यांना सन्मानित करणे, काही टीम बिल्डिंग अँक्टिव्हिटी करणे, आणि मनोरंजन. 
सकारात्मक दृष्टिकोन आणि विचार घेऊन कोणत्याही कार्यात उतरले की नक्कीच जबरदस्त कामगिरी होते. 
या मीटिंग मध्ये कमीत कमी 30 नवीन सहकार्यांना स्वतःहून भेटायचे म्हणजे आपणहून बोलायचे आणि ओळख करून घ्यायची  हे ध्येय ठेवले होते. सध्याच्या युगात अनेकांना एकमेकांशी बोलायचे असते पण सुरवात करायला घाबरतात किंवा व्यकक्तिक अहंकार आड येतो आणि संभाषण होत नाही. 
 असे ठरवून निघालो आणि योगायोगाने मला आमची मुंबई ची बस होती तिचे नेतृत्व करायची संधी मिळली. सर्वांत जास्त मेंबर 31 जणांची बस ची सर्व व्यवस्था बघायची जबाबदारी कंपनीने मला दिली होती. मग काय तिथूनच मी माझे नेतृत्वगुण implement करायला सुरुवात केली. बस मधे माईक होताच. 2 थांब्यावरून सर्वांना बस मधे घेतल्यावर सर्वांचा मस्त नाश्ता झाला की मग माईक हातात घेऊन सर्वांची ओळख करून घेतली आणि सुरवात झाली करोके लाऊन गाणी म्हणायची. शेवटी. अंबी वॅली येता- येता "जय जय महाराष्ट्र माझा" या गाण्याने शेवट केला आणि सर्वांनी प्रवास कसा झाला हे समजलच नाही अशी कौतुकाची थाप दिली.
मीटिंग मधे काही टीम बिल्डिंग अँक्टिव्हिटी होत्या. पहिली होती "कोड रेड" आणि दुसरी होती बटरफ्लाय इफेक्ट. पहिल्यामध्ये मी 10 जणांच्या टीमचा भाग होतो. ज्यात आम्ही दुसरा नंबर काढला आणि बटरफ्लाय इफेक्ट मध्ये ज्यात एकूण 90 जणांचा ग्रुप होता ज्यात 10 छोटे छोटे ग्रूप होते त्या सर्वांचा क्लस्टर हेड म्हणून मी होतो. त्यात आमचा पहिला क्रमांक आला. 
रात्री टॅलेंट शो मध्ये पहिल्या दिवशी स्वलिखित कविता सादर केली आणि दुसरा दिवस ग्रुप डान्सने गाजवला. 
यासोबत आमच्या कंपनीत सुद्धा IPL च्या धर्तीवरबिझनेस च्या 29 टीम बनवल्या होत्या.  त्यात कामातील पहिल्या सहा महिन्यात उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दुसरा नंबर पटकावला. 

परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा सर्वांना बोलते केले आणि सर्वांना हा इव्हेंट कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया घेतल्या. सर्वजण खूप खूष होते आणि माझे नियोजनाबद्दल ही भरभरून बोलले त्यामुळे मीही आनंदित झालो. 
अशाप्रकारे एक all-rounder असा हा इव्हेंट पार पडला. 
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)