संस्कृती

                        *संस्कृती*
वडीलधारी माणस नेहमी म्हणत असतात, आपली संस्कृती जपा, परंपरा जपा. त्याचे महत्व आज समजतंय. भारतावर असंख्य स्वाऱ्या झाल्या. अब्जो ची संपत्ती लुटून नेली, अनेक मुस्लिम टोळीवाले आले आणि येथील संपत्ती, सोने घेऊन गेले. पण आपल्या माणसांनी जपली ती संस्कृती. ती ते संपवू शकले नाहीत. काल अफगाणिस्थान चे हाल बघून जाणवले, यांनी एवढे लुटले पण आज जगायला तरसत आहेत. अफगाणिस्थान च्या राष्ट्रपती भवनात अहमद शाह अब्दाली चा फोटो आहे, ज्याने त्याच्या माणसांसाठी भारतावर स्वाऱ्या केल्या. आणि आज तीच मानस आपापसात लढून मरत आहेत. माझा धर्म स्रेष्ठ आणि तोच वाढला पाहिजे म्हणणारे आज स्वतः चे जीवन संपवत आहेत. जर अब्दाली ने येथून संपत्ती सोबत संस्कृती, येथील सहिष्णुता, उदारपणा नेला असता, तर आज, सिरिया, अफगाणिस्थान, इराण, पाकिस्थान सारखे जगाला डाग नसते लागले. 
म्हणून आपली संस्कृती जपा, ही एकपिढीकडून दुसऱ्या पीढिकडे जाणे गरजेच आहे. 
आज भारत परत जागतिक महासत्ता बनत आहे, आर्थिक उलढालीचा झरा बनला आहे. जे लुटारू म्हणून जगले ते आजही अमेरीका, रशिया, चीन च्या तुकडायवर जगत आहेत आणि एकमेकांत लढत आहेत. 
भारतात येण्यासाठी आज अनेक जण प्रयत्न करत आहेत कारण येथील संस्कृती त्यांना स्वतंत्र, आनंदात जगायला देत आहे. 
म्हणून ही महान संस्कृती जपणे ही आपली जबाबदारी आहे. 
   --- जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)