नशिबाचे खेळ

नशिबाचे खेळ
कधी कधी नशीब आपल्यासोबत असा खेळ खेळते की देव देखील त्याला टाळू शकत नाही.. आपले शिक्षण, आपले प्रयत्न, आपले अथक परिश्रम, आपली श्रद्धा सर्व कसोटीवर लागते पण यश काही हातात येत नाही. तरीही सकारात्मक कसे राहावे हे ज्यांच्यकडून शिकायला भेटते अशा सौ शुभांगी अमित कदम यांची ही कहाणी.
स्वतः पेशाने फार्मासिस्ट वडील शिक्षक, घरात सर्व सुशिक्षित. नवरा ड्राफ्ट्समन. विवाह नात्या मध्ये नाही झाला, दोघांचे ब्लड ग्रुप पण वेगळे. सासू सासरे देखील प्रेमळ. नवऱ्याला फक्त मधुमेहाचा त्रास वयाच्या १३ व्या वर्षा पासून आहे. त्याची औषध सुद्धा चालू होतीच. सर्व काळजी घेऊन देखील मोठ्या मुलाचा चिन्मयचा जन्म १ महिना लवकर झाला. डिलिव्हरी नॉर्मल झाली परंतू जन्मताच तो रडला नाही. इथेच मनात पाल चुकचुकली आणि नको ते झालं. बाळ दिव्यांग आहे हे पुढे जाऊन समजले. त्याला हळूहळू मोठ करत असताना हार मानतील त्या शुभांगी ताई कसल्या. अनेक डॉक्टरनी सांगितले होते की एकाला दोघे असतील तर दिव्यांग मुलाची बुद्धीची वाढ होण्यात मदत होते. पहिल्या वेळेचा अनुभव पाठीशी होता. यावेळी सर्व काळजी घेऊन, सर्व आवश्यक टेस्ट करून दुसऱ्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तळहातावरील फोड जपावा इतकी काळजी घेतली, सर्व टेस्ट केल्या, डिलिव्हरी नॉर्मल झाली, पण पुन्हा एकदा नशीब आडवे आले.  बाळ व्यवस्थित रडले सुद्धा पण नंतर समजले बाळाचा बॉडी टोन कमजोर आहे. ते स्वतच्या पायावर उभ राहू शकत नाही. त्याच नामकरण भावित झालं. चिन्मयच सर्वकाही करत करत ९ वर्ष काढलीत आणि अक नवीन आशेचा किरण म्हणून भावित झाला तर देवाने त्यालाही पूर्ण सक्षम दिले नाही. अशा दोन्हीकडून अवघड परिस्थिती असताना शुभांगी ताई हार न मानता लढत आहेत. 
 वाशी मध्ये ईटीसी सेंटर मग सनशाईन शाळेत आणि सहायोगनी मध्ये थेरेपी साठी दोन्ही मुलांना घेऊन जात असतात. सोबत सासू आणि नवऱ्याची साथ भेटत आहे त्यामुळे परिस्थितीशी त्या दोन हात करत लढत आहेत. 
नशिबाने साथ दिली नाही तरी त्या सकारात्मक  असतात त्यांचा त्यांच्या कर्मावर विश्वास आहे. चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवत त्या सर्वांशी भेटतात. न थकता त्या दोन्ही मुले, नवरा आणि सासू यांची सेवा करत असतात. 
अशा व्यक्तीकडून नक्कीच खूप काही शिकण्यासारखे आहे. 
शुभांगी ताई तुम्ही असेच प्रयत्न करत रहा. सहयोगनी संस्था तुमच्या सोबत अशीच उभी राहील.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)