*सहनशीलता, आदर, विश्वास आणि क्षमा*
*सहनशीलता, आदर, विश्वास आणि क्षमा*
मागच्या आठवड्यात दिलीप दादाना आपलं मुंबई मंडळ भेटायला गेलो एक छान मासिक वाचनात आल. त्यातील एक गोष्ट खूप आवडली. ती अशी एक गाव असतो. गावात खूप हुशार, कर्तबगार अशी मंडळी असतात पण गावचा हवा तसा विकास होत नसतो. आजूबाजूची लहान लहान गाव चांगली प्रगती करत असतात. या गावात नेहमी आपापसात वाद, तंटे होत असतात. एकाने काही काम हातात घेतले की दुसऱ्याने त्यात खोडा घालायचा, दुसऱ्याने काही चालू केले की पाहिल्याने त्यात अडथळे आणायचे. सहमत कुठे होत नसे आणि यात गाव मागे पडत होता. हव्या तशा योजना येत नव्हत्या. एक दिवशी गावात एक साधू येतात. सरपंच त्यांचं स्वागत करतात सर्व पाहुणचार करतात. साधू दोनचार दिवस राहतात आणि निघायची तयारी करतात. तेव्हा न राहून सरपंच त्यांना प्रश्न विचारतात "महाराज, गावात खूप तंटे होत असतात एकी नाहीये यावर काही उपाय सांगा." महाराज म्हणतात: "मला असेल फालतू प्रश्न विचारू नका". यावर इतकावेळ शांत असलेले सरपंच चिडतात आणि महाराजांना खूप काही बडबडतात. अगदी त्यांची लायकी काढतात. गाव आमचा आहे तुम्हाला काय माहित कसा चालतो ते अस अनेक खडे बोल सुनावत असतात. हे सर्व ऐकून घेऊन महाराज सांगतात हाच अडथळा आहे तुमच्या एकी मध्ये. सरपंच न कळून प्रश्र्नार्थ विचारतात म्हणजे नक्की काय? महाराज म्हणतात *"सहनशीलता, एकेमेकांविषयी आदर, विश्वास आणि क्षमा करण्याची वृत्ती का एकदा अंगी भिनली की कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही."
सरपंचांना त्यांची चूक कळते आणि ते महाराजांना नतमस्तक होत प्रणाम करतात आणि त्यांना आदराने निरोप देतात.
शब्द संकलक
जयंत जगताप
Comments
Post a Comment