सहयोगी नी चे यश
सहयोगीने चे यश.
10 वर्षा पूर्वी दिव्यांग मुलांच्या पालकांनी मिळून दिव्यांग मुलांसाठी संस्था सुरू केली. संस्थेचे मूळ उद्देश समाजातील कमजोर, गरीब घटकातील दिव्यांग मुलांना उपचार मिळावेत ज्यांना गरीब परिस्थिती मुळे विविध थेरेपी घेता येत नाहीत त्यांना त्या थेरेपी मिळवून उपलब्ध करून देणे. यासाठी अशा गरीब कुटुंबपर्यंत पोचने आवश्यक होते. त्यासाठी संस्थेमधील सदस्य सुधीर कोपरखैरणे घणसोली परिसरात सर्वे करत असताना त्यांना श्यामलता पांडे यांचं कुटुंब निदर्शनास आले.
श्यामलता ही छत्तीसगढ मधील सर्गुजा गावची तर नवरा सभाजित पांडे हे बनारस उत्तर प्रदेश चे रहिवाशी. लग्न करून दोघे पोटापाण्यासाठी 30 वर्षापूर्वी मुंबईत आले.
सभजित हे लांड्री कंपनीत कपडे धूने चे काम करत असत तर श्यामलता घर सांभाळत. लवकरच त्यांना धरती नावाची गोंडस मुलगी झाली. सर्व काही व्यवस्थित चालू होते. तिघांचं संसार आनंदात चालू होता. काबाड कष्ट करून सभाजीत घर चालवत होता आणि शांमलाता त्याच मेहनतीने घर सांभाळत होती. काही वर्षांनी दुसरी मुलगी जन्माला आली अंजली. अंजली जन्मताच अपंग जन्मली. पण अपंगत्व तरी किती असावे. देवाने जणू काही पूर्ण जगाची शिक्षा त्या लहान बाळाला आणि तिच्या आई वडिलांना दिली होती. शरीराची हाडे कमजोर, हात आणि पायाची हाडे जागोजागी मोडलेली, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, तोंडाने बोलता येत नाही आणि हे कमी की काय म्हणून सतत येणारी आखडी. एकाच वेळी सात पिढ्यांचे दुःख कोसळल. श्यामलता आणि सभाजीत ने या परिस्थितीत पण अंजली चां सांभाळ केला आणि तिला मोठ केलं. तिची एवढं मोठ अपंगत्व त्यांनी तिला जाणवू दिलं नाही. पण देवाला देखील बघावल नाही. तिसरं बाळ दिलं. यांना एक आशेचा किरण दिसला. तीच नाव लक्की ठेवलं. पण लक्की पण एक डोळ्याने आणि दोन्ही कानांनी अपंग आहे. ती बोलू शकत नाही पण हावभाव करून तिच्या गरजा सांगते. असा दोन अपंग मुलींना श्यामलता आणि सभाजित मोठ करत होते सोबत मोठ्या मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू देत नव्हते.पण दोन्ही मुली घरीच असत त्यामुळे त्यांच्यात प्रगती होत नव्हती. 9 वर्षापूर्वी सहयोगी ने त्यांना खूप विनवणी करून सहायोगणीने मध्ये येण्यास तयार केले. सयोगिणी मध्ये विविध थेरेपी घेऊन अंजलीची परिस्थिती सुधारली. लक्की हुषार झाली, तिची motor skiil communication स्किल devlop झाले. एवढेच नाहीतर लॉक डाऊन मध्ये जेव्हा सभजीत ची नोकरी गेली तेव्हा सहयोगीनी मधून त्यांना सर्व राशन आणि औषधे घरी पोहचवली गेलीत.
अशा बिकट परिस्थितीवर मात करत असताना गेल्यावर्षी साभाजितच्या वडिलांचे निधन झाले त्यांना अग्नी द्यायला ते गावी गेले आणि त्यांचे देखील तिकडे निधन झाले. श्यामलता वर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा दोन दिव्यांग मुलींना घेऊन बनारस ल कसे जायचे हा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. तेव्हा पुन्हा एकदा सह्योगिणी संस्था किती श्रेष्ठ आहे हे दिसले. दोन्ही मुलींना संस्थेत ठेऊन त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन श्यामलताला विमानाने बनारस ला पाठवले. 20 दिवस त्या दोन जीवांना शयोगणी ने आई-वडील बनून सांभाळले. एवढेच नाही तर परत आल्यावर श्यामलता ला रोजगार दिला. आज श्यामलाता शाळेत रोट्या बनवायचे काम करते. लक्की ची थेरपी, अंजली चे औषधे सहयोगीनी बघते.
श्यामलता ची जिद्द बघून. मला माझ्या मुलासाठी लिहलेली कविता इथे आठवत आहे.
ती इथे सादर करतो
हम लढेंगे हम लढेंगे, हम जीतेंगे हम जीतेंगे
हमारी राह है मुश्किल पर नामुनकीम नही!
राह मे है कही मोड पर अंत नही है!
संकटो से डरकर भागने वाले हम नही है!
हम लढेंगे हम लढेंगे, हम जीतेंगे हम जीतेंगे!
जीतनी बार गिरेंगे, दूगने हौसले से ऊठेंगे!
माना मंजील हमारी दूर है, मगर जीते बिना रूकना हमे भी कहा मंजूर है!
मेरे बेटे तेरी रास्ते के हर तूफान को हम पलट देंगे, तेरी खूशी तेरी कदमो मे लाकर ही दम लेंगे!
बहुत देखे होंगे भगवान तुमने, अब हमे भी देख लेना!
तूम सितम ढालते रहना.. हम हस हस के उन्हे सेह लेंगे!
एक दिन तूम भी देख लेना हमारे हौसलो के सामने तूम्हारे सितम भी फीके होंगे!
हम लढेंगे हम लढेंगे, हम जीतेंगे हम जीतेंगे!
जयंत जगताप
Comments
Post a Comment