आरक्षण
*आरक्षण कोणाला असायला हवे*
2000 च्य काळात जेव्हा आम्ही 10वी ला होतो तेव्हा आम्हाला आमची जात 10 वी पर्यंत माहीत नसायची. शाळेत तर हेच शिकवलं जायचं की सर्व मानव समाज एक आहे. सर्व जाती-धर्म सामान आहे. मग leaving certificate वर लिहून यायचं धर्म आणि जात. बरं आम्हाला घरात ही असली शिकवण नसायची की आपण अमुक आणि तमुक जातीचे.
मग जस कॉलेज admission चालू झाले की या आरक्षण रुपी वृक्षाचे विषारी फळे चाखायला भेटायची. या आरक्षणाच्या झाडावर अशी व्यवस्था केली आहे की तुम्ही की हुषार असा किंवा नसा पण जर तुमची जात नसेल तर तुम्हाला खालीच ठेवले जाते. जात असली की शिडी लाऊन आरक्षण रुपी झाडावर चढवले जाते. आणि तिथून पुढे गुणवत्ता नसली तरी वर वर शिड्या दिल्या जातात.
बरं घटनेनुसार काही काळ हे आरक्षण योग्य होते कारण काही दुर्बल घटक प्रवाहात आणणे गरजेच होत. जर आता त्या दुर्बल घटकातील बहुतांश समाज प्रवाहात आला असेल तर त्यांनी हा लाभ घेणे बंद केले पाहिजे आणि आता जे अजूनही या लाभापासून वंचित आहेत त्यांना आरक्षण लाभ भेटला पाहिजे. जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना आरक्षण भेटले पाहिजे.
आज मराठा समाज लढतोय तो याच आर्थिक दुर्बल समाज बांधावसठी.
आज काही राजकीय नेते स्वतःची मतपेटी वाचावी म्हणून दोन जातीत, दोन समाजात भांडण लावत आहेत. मनाने लढायला तयार रहा अस चिथावणी देत आहेत. त्यावर दुसऱ्या समाजातील नेते आक्रमक झाले की त्यांचं शिक्षण कमी आहे अस बोलत आहेत. यावर मला त्या नेत्याला सांगावस वाटत, अरे बाबा तुझा समाज जर शिकलेला आहे तर कशाला आरक्षण वाचवत बसला आहेस. जर तुम्ही कोणाच्या बापाला घाबरत नसाल तर कशाला आरक्षणाच्या कुबड्या वाचवत बसलाय. असेल दम तर द्या फेकून आरक्षण आणि करा स्वताला सिद्ध.. तुमच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यात द्या शिक्षण फुकट मध्ये..
मला तर अस वाटत जे शिक्षण सम्राट आहेत त्यांनी त्यांचा त्यांच्या समाजातील गरीब घटकांना मोफत किंवा कमी खर्चात शिक्षण द्यावे.. सरकारने नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ नये. जे पात्र असतील ते शिक्षणाच्या आणि बुध्दीच्या आधारे नोकरी मिळवतील. मग बघा समाजातील तेढ कमी होईल. उगाच माझं आरक्षण वाचवा म्हणून लढ्याया होणार नाहीत.
लेखक
जयंत जगताप
Comments
Post a Comment