त्यागाची कहाणी सुजल भाईगडे
त्यागाची कहाणी
आपल्या आजूबाजूला आपण अनेक गोष्टी ऐकत असतो ज्यांनी आपण भारावून जातो. कोणाचा संघर्ष, कोणाची जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा तर कोणाचा त्याग. ही गोष्ट अशाच आजी ची आहे जिने नातावसाठी सर्व घरदार, शेती, नातेवाईक सोडले आणि नातू साठी स्वतःला वाहून घेतले आहे. गोष्ट आहे सौ. रेखा भगवान साळुंखे यांची. यांना 2 मुली. दोन्हींचे लग्न लाऊन दिले आणि गावाकडे आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत आपलं जीवन व्यतीत करत होत्या. पण नयतीला हे पहावले नाही, मुलीला अर्चनाला पहिला मुलगा झाला आणि तो अपंग आहे अस अस समजलं. घरची परस्थिती बेताची होती. उपचारासाठी मोठा खर्च लागणार होता. त्यामुळे मुलगी आणि जावई दोघांनी नोकरी करणे भाग होते. अशात दिव्यांग मुलाकडे कोण बघणार? तेव्हा आपल्या मुलीच्या लेकरासाठी आणि आपल्या नातवासाठी रेखाआजी सर्व घरदार शेतीभाती सोडून, नातेवाईक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या नवऱ्यासह मुलीचा घरी राहून सुजलला सांभाळले. त्याची सर्व सेवा, उपचार बघितले. अगदी शाळेत आणणे ते सर्व औषध उपचार फक्त त्याच करत असतात.
आपल्या नातावासाठी पराकोटीचा त्याग करणाऱ्या रेखा आजी ना सहयोगनी चां सलाम..
Comments
Post a Comment