भावकी

                 *भावकी*
काही लोक म्हणतात भावकी लय वाईट.. नको तिथं अडवतात.. आमच्या कर्यातच अडवतात.. आम्हाला एकट पाडतात... शासन करतात, दंड ठोकतात.. भावकी बाहेर टाकतात.. 
   अरे लेका भावकी बनते ती भावा-भावाच्या एकितून, सहकार्यातून, एकमेकांना अवघड काळात केलेल्या मदतीतून आणि आनंदक्षणी एकत्र होऊन केलेल्या जल्लोषाने.. जस आपण देशाचे, समाजाचे देणे लागतो तस भावकीचे पण देणे लागतो. जर आपण आपल्या भावासाठी भावकिसाठी झटलो तर भावकी तर झटनारच.. पण कोणी वाकडी नजर केली तर आपल्या साठी पहिली उभी राहणार.. पण भावकी फक्त आपल्या स्वार्था साठी वापरली आणि तिला गृहीत धरले तर ती दुरावते..म्हणून पाहिलं आत्मपरीक्षण करावं.. आपण किती प्रामाणिक आहे हे ओळखावं.. जर आपला जिव्हाळा खरा असेल, नुसता दिखावा नसेल तर भावकी आपलीच असते. ती आपल्या जिवाभावाची असते.. तिला जपावं, टिकवाव... तिचा सन्मान जपावा.. त्यातून मिळेल आत्मविश्वास, प्रेम, आपुलकी, सन्मान..
म्हणून भावकी जपा.. ती तुम्हाला जपेल... 

जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)